मारुती सुझुकी एर्टिगा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी सात सीटर MPV आहे. त्याच्या किफायतशीर किमतीमुळे आणि CNG मध्ये उपलब्ध असलेल्या उत्कृष्ट मायलेजमुळे हे चांगले आहे. परंतु Kia च्या उपस्थितीमुळे MPV Ertiga साठी समस्या निर्माण होत असल्याचे दिसते. Kia Carens MPV ने भारतात १ लाखाहून अधिक युनिट्सची विक्री नोंदवली आहे. किआ केरेन्सला हा आकडा पार करण्यासाठी केवळ १६ महिने लागले. सेल्टोस नंतर कंपनीसाठी हे दुसरे यशस्वी उत्पादन ठरत आहे.

कंपनीने फेब्रुवारी २०२२ मध्ये Kia Carens लाँच केले. कॅरेन्सने पाच महिन्यांत (जानेवारी-मे २०२३) ३२,७२४ युनिट्सची विक्री केली आहे. त्याची दर महिन्याला सरासरी ६,५४४ युनिट्सची विक्री होत आहे. भारतात या MPV च्या यशाचा पुरावा १४ जानेवारी २०२२ रोजी सुरू झालेल्या बुकिंगच्या पहिल्या काही दिवसांत दिसून आला. पहिल्या २४ तासांत याला ७,७३८ बुकिंग मिळाले आणि १० मार्चपर्यंत बुकिंगने ५०,००० चा टप्पा ओलांडला.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग

(हे ही वाचा : Tata-Hyundai चा गेम होणार! महिंद्रा आणतेय सर्वाधिक खप होणाऱ्या ‘या’ SUV कारला ६ सीटरसह नव्या अवतारात )

इंजिन आणि सुरक्षितता

Kia Carens मध्ये १.५ लीटर पेट्रोल, १.४ लीटर पेट्रोल आणि १.५ लीटर डिझेल इंजिनचा पर्याय मिळतो. पेट्रोल इंजिन ११५एचपी ते १४० एचपी पॉवर जनरेट तरते. तर डिझेल इंजिन ११५एचपी पॉवर जनरेट करते. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी १०.२५ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पुश-बटन स्टार्ट-स्टॉप, क्रूझ कंट्रोल, सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आमि ६४ रंगांची अँबिएंट लाइटिंग देण्यात आली आहे.

कंपनीने आधुनिक शैली आणि वैशिष्ट्यांची लांबलचक यादी असलेली केरेन्स लाँच केली. यात ६ आणि ७ सीटर पर्याय आहेत. Kia च्या या MPV ला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये तीन स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. कंपनी त्यात मानक वैशिष्ट्य म्हणून ६ एअरबॅग देत आहे.

किंमत

कंपनीने फक्त ८ लाख ९९ हजारांच्या सुरुवातीच्या किंमतीत ही कार लाँच केली होती.