Kia recalls over 30,000 Carens MPV: Kia ने Carens च्या ३०,००० हून अधिक युनिट्स परत मागवल्या आहेत. दक्षिण कोरियाच्या कार निर्मात्याने सांगितले की, कंपनीने सदोष इन्स्ट्रुमेंट कन्सोलमुळे सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान उत्पादित एकूण ३०,२९७ कॅरेन्स परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. किआने केरेन्स एमपीव्हीला सदोष इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमुळे रिकॉल केले आहे ज्यामुळे बूटिंग-अप समस्या येत होत्या. यामुळे, १२.५-इंच ड्रायव्हरचा कन्सोल रिक्त होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किआचा असा विश्वास आहे की, सदोष युनिट्स सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान तयार करण्यात आल्या होत्या. आता कंपनी या गाड्यांच्या मालकांशी बोलून सॉफ्टवेअर मोफत अपडेट करेल. किआ इंडियाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “कंपनीने वाहन तपासणीसाठी रिकॉल मोहीम सुरू केली आहे आणि आवश्यक असल्यास ते विनामूल्य सॉफ्टवेअर अद्यतने देखील देऊ करेल.”

(हे ही वाचा : महिंद्राच्या ‘या’ SUV ची देशभरात क्रेझ, लोकांची शोरूम्समध्ये तुफान गर्दी, आतापर्यंत ९ लाख युनिट्सची विक्री )

यापूर्वी गेल्या ऑक्टोबरमध्ये, किआने एअरबॅग कंट्रोल मॉड्यूल (ACU) सॉफ्टवेअरमध्ये संभाव्य दोष तपासण्यासाठी Carens MPV ची ४४,१७४ युनिट्स परत मागवली होती. त्यावेळी Kia इंडियाने सांगितले होते की कंपनीने चाचणीसाठी युनिट्स परत मागवले आहेत आणि गरज पडल्यास मोफत सॉफ्टवेअर अपडेट देईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kia has recalled 30297 units of the carens mpv in india owing to a potential software error in the digital instrument cluster pdb
Show comments