Kia India ही देशातील एक लोकप्रिय कार उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी Kia इंडिया नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. kia इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने ब्रँड न्यू इलेक्ट्रिकल वाहन EV6 २०२३ च्या सिरीजचे बुकिंग सुरू केले आहे. किआची ही गाडी ग्राहकांना २ प्रकारांत उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना हे इलेक्ट्रिक वाहन GT Line आणि GT Line AWD व्हर्जनमध्ये मिळेल. कंपनीने या दोन्ही कारच्या एक्स-शोरूम किंमतीचीही माहिती दिली आहे.

EV6 GT Line ची सुरुवातीची (एक्स-शोरूम) किंमत ६०.९५ लाख रुपये अणि EV6 GT Line AWD ची सुरुवातीची (एक्स-शोरूम) किंमत ६५.९५ लाख रूपये आहे. कंपनीने एक निवेदनामध्ये ही माहिती दिली आहे. Kia ने २०२२ मध्ये आपली पूर्ण इलेक्ट्रिक कार EV6 लॉन्च केली होती. जून २०२२ मध्ये हे वाहन कंपनीने लॉन्च केले होते. ही कार भारतामध्ये CBU म्हणजेच कंप्लिट बिल्ट युनिट अंतर्गत आयात केली जाते. ही कार एकदा चार्ज केली की ७०८ किमी धावते असा कंपनीचा दावा आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?

हेही वाचा : ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणार Tata च्या ‘या’ अपडेटेड कार्स; अनेक कंपन्यांना फुटणार घाम, जाणून घ्या सविस्तर

किआ इंडियाचे एमडी आणि सीईओ ताई-जिन पार्क म्हणाले की, या वर्षासाठी कंपनी विस्तारावर अधिक लक्ष केंद्रित करेल. गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये कंपनीने ४३२ युनिट्सची विक्री केली होती. सध्याच्या १५ डिलरशिपसह सर्व ६० आउटलेपर्यंत १५० kw हाय-स्पीड चार्जर नेटवर्कचा विस्तार करण्याची योजना आखत आहे.

२०२२ मध्ये कंपनीने EV6 लॉन्च केले. या आधी २६ मे पासून याचे बुकिंग १३ शहरांमधील १५ डिलर्सकडे झाले होते. यामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद, गुरुग्राम, नोएडा, जयपूर, चेन्नई, बंगळुरू, कोची, हैदराबाद आणि कोलकाता यांचा समावेश आहे. किआ इंडियाच्या EV २ गाडी ५.२ सेकंदात ०-१०० किमीचा स्पीड पकडते. यामध्ये कंपनीने फास्ट डीसी चार्जिंग, वाहन-टू-लोड (V2L), १४ स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टम, ADAS, कनेक्टेड कार टेक, एक कर्व्ह डिजिटल कन्सोलसह अनेक फीचर्स दिले आहेत. तसेच कंपनीने या गाडीमध्ये सिंगल PMS इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. जे २२६ बीएचपी आणि ३५० NM ट्रॅक जनरेट करते. हे पॉवर जीटी लाईनसाठी आहे. GT लाइन AWD ला ड्युअल इलेक्ट्रिक मोटर मिळते जी ३२० बीएचपी आणि ६०५ nm टॉर्क जनरेट करते.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 7 April: ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

कंपनीच्या वेबसाइटनुसार या वाहनात ५ रंगांचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. Runway Red, Yach Blue, Moonscape, Aurora Black Pearl आणि Snow White Pearl या पाच रंगांमध्ये तुम्ही हे EV मॉडेल खरेदी करू शकता. सेफ्टी फीचर्समध्ये तुम्हाला कारमध्ये ड्युअल LED हेडलॅम्प्स, इलेक्ट्रिक सनरूफ, ६०.४० स्प्लिट रिअर सीट, १९ इंचाचे अलॉय व्हील्स आणि १२.३ इंचाचा टचस्क्रीन असे फीचर्स यामध्ये मिळतात.

Story img Loader