New Kia Carnival : Kia Indiaने आता न्यू जनरेशन कार्निव्हल MPV लाँच केली आहे. लाँच करताच या कारच्या किंमती सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहे. Kia Carnival दोन प्रकारांसह लाँच करण्यात आल्या आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये या कारची डिलीव्हरी सुरू होणार आहे. आज आपण कार्निव्हल एमपीवीची किंमत व फीचर्स विषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Kia India’s New Carnival: Kia India has launched the new Carnival its price and features what’s news check)
कार्निव्हल एमपीवीचे प्रकार आणि किंमत (Kia Carnival MPV Variants & Price)
Kia Indiaने कार्निव्हल एमपीवीचे दोन प्रकार ग्राहकांसाठी आणले आहे. पहिला प्रकार म्हणजे लिमोसिन आणि दुसरा प्रकार म्हणजे लिमोसिन प्लस. या दोन प्रकारासह ती मार्केटमध्ये उपलब्ध राहणार आहे. ही कार तुम्ही सुरुवातीची किंमत ६३.९० लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता. पुढे या कारच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते.
कार्निव्हल एमपीवीचे फीचर्स (Kia Carnival MPV Features)
कानिव्हलमध्ये अनेक हटके फिचर्स आहेत जे ग्राहकांच्या त्यांच्याकडे आकर्षित करतील. कार्निव्हलमध्ये ड्युअल सिंगल-पॅन इलेक्ट्रिक सनरूफ, इंफोटेनमेंट आणि इन्स्ट्रुमेंट पॅनेलसाठी ट्विन १२.३ इंच डिस्प्ले, पॉवर आणि वेंटिलेडेट फ्रंट सीट्स, पॉवर्ड रियर डोअर, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरसह ३६०-डिग्री सराउंड कॅमेरा, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, १२ स्पीकर प्रीमियम म्युझिक सिस्टीम आणि लेव्हल 2 ADAS सूट देण्यात आला आहे.
या कार्निव्हल कारच्या बाहेरचा लूक अत्यंत आकर्षक आहे. नवीन ग्रिलबरोबर नवीन फेसिया, वर्टिकल स्टॅक्ड एलईडी हेडलॅम्प, उलट एल-आकाराचे एलईडी डीआरएल, कॉन्ट्रास्ट-कलर स्किड प्लेट, टेलगेटवर एलईडी लाइट बार, नवीन अलॉय व्हील्, फ्रेश रुफ रेल आणि शार्क फिन अँटेना सुद्धा आहे.
नवीन किआ कार्निव्हल २.२-लीटर डिझेल इंजिनने पावर देते जे आठ-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सशी जोडलेला आहे. ही मोटार १९७ bhp आणि ४४०Nm चा पीक टॉर्क तयार करते आणि पावर रियर व्हिल्सपर्यंत पाठवले जाते. विशेष म्हणजे ऑटोमेकर ने देशात कार्निव्हल MPVच्या २,७९६ पेक्षा जास्त बुकिंग आधीच केल्या आहेत.