Kia Seltos facelift bookings open: दक्षिण कोरियाची ऑटोमेकर कंपनी Kia India (Kia) ने भारतात नव्या २०२३ किया सेलटोस (2023 Kia Seltos) फेसलिफ्टचं अनावरण केलं आहे. Kia Seltos ही भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे. नवीन सेल्टोसमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन 2023 Kia Seltos फेसलिफ्टसाठी प्री-बुकिंग सुरू झाली आहे. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन किंवा डीलरशिपवरून ऑफलाइन बुक केले जाऊ शकते. त्याचे बुकिंग २५,००० रुपयांच्या टोकन रकमेने करता येईल. बाजारात त्याची स्पर्धा Hyundai Creta आणि Maruti Suzuki Grand Vitara सारख्या एसयूव्हीशी आहे. या कारची किंमत येत्या महिन्यात समोर येईल, अशी माहिती आहे.

(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ कार्स खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा, पण डिलीव्हरीसाठी तरसत राहाल, पाहा वेटिंग पीरियड )

2023 Kia Seltos फेसलिफ्टला नवीन १.५-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते, जे जास्तीत जास्त १६० PS पॉवर आणि २५३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन नवीन सेल्टोसला सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली एसयूव्ही बनवते. यात AT, DCT, IVT, iMT आणि MT सारखे ट्रान्समिशन पर्याय मिळतात. त्यात आणखी दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. Kia Motors ने अद्ययावत सेल्टोस अशा वैशिष्ट्यांसह सादर केले आहे.

2023 सेल्टोस ८ सिंगल टोन, २ ड्युअल टोन आणि अनन्य मॅट ग्रेफाइट कलर पर्यायामध्ये ऑफर केले आहे. २०२३ सेल्टोसच्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या SUV मध्ये तुम्हाला ADAS लेव्हल २ तंत्रज्ञान मिळते ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि बरेच काही समाविष्ट आहे. याशिवाय ६ एअरबॅग्स उपलब्ध असून, रिव्हर्स कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्सही कायम ठेवण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kia india has opened bookings for the seltos facelift for a token amount of rs 25000 pdb
Show comments