किआ इंडियाने आपलं सगळं लक्ष सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटवर केंद्रित केलं आहे. कंपनी लवकरच एक नवीन कार बाजारात लाँच करणार आहे.  Kia लवकरच तिसरी SUV भारतीय बाजारात लाँच करू शकते. ही Kia Clavis असू शकते, जी कंपनीची भारतातील पाचवी ऑफर असेल. AY कोडनेम असलेली ही मायक्रो एसयूव्ही चार मीटरपेक्षा कमी लांब असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची चाचणी सुरू झाली आहे आणि अशी अपेक्षा आहे की, उत्पादन मॉडेल २०२४ च्या उत्तरार्धात लाँच केले जाऊ शकते. बाजारात त्याची टक्कर टाटा पंच आणि ह्युंदाई एक्सेटरशी होईल.

रिपोर्ट्सनुसार, Kia Sonet आणि Seltos च्या तुलनेत Clavis चे डिझाईन अधिक बॉक्सी असेल. पुढील बाजूस, यात Kia ची सिग्नेचर ग्रिल, बंपर-माउंट एलईडी हेडलॅम्प, मोठा एअर डॅम मिळू शकते. Kia ची ही नवीन कॉम्पॅक्ट SUV रडार-आधारित ADAS तंत्रज्ञान आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्सने सुसज्ज असू शकते. फ्रंट ग्रिल आणि ORVM वर स्थापित केलेले कॅमेरे असे सुचवतात की ते ३६० डिग्री कॅमेरासह येऊ शकतात.

Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?
Transport Minister Pratap Sarnaik proposal regarding the cable car project Mumbai news
महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्प उभारण्याची गरज; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा प्रस्ताव
Honda new year discount honda car offers upto 90,000 discount in January
HONDA ची बम्पर ऑफर! नववर्षात ‘या’ ३ गाड्यांवर ९०,००० पर्यंत डिस्काउंट, होईल पैशांची बचत

(हे ही वाचा : मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट; ग्राहकांसाठी पैशाची बचत करण्याची मोठी संधी)

अहवालानुसार, नवीन Kia Clavis मध्ये ड्युअल-टोन अलॉय व्हील, फ्लश-प्रकारचे डोअर हँडल, L-आकाराचे LED टेल लॅम्प आणि थोडेसे खाली-माउंट केलेले ब्रेक लाइट्स मिळतील अशी अपेक्षा आहे. पॅनोरॅमिक सनरूफ मिळणे देखील अपेक्षित आहे, जर असे झाले तर ते सेगमेंट फर्स्ट फीचर असेल.

कारमध्ये हवेशीर पुढील सीट, एसी व्हेंट्स, फोन चार्जिंग सॉकेट आणि तिन्ही प्रवाशांसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट यांसारखी अनेक वैशिष्ट्ये असू शकतात. ही कार ICE आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन या दोन्ही पर्यायांसह ऑफर केले जाऊ शकते. हायब्रीड पॉवरट्रेनसह येणारे हे कंपनीचे पहिले मॉडेल असू शकते. सोनटचे १.२L NA आणि १.०L टर्बो पेट्रोल इंजिन ICE व्हेरिएंटमध्ये आढळू शकतात. इलेक्ट्रिक मॉडेलला फ्रंट-एक्सल माउंट केलेल्या इलेक्ट्रिक मोटरसह सुमारे ३०-३५kWh चा बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader