किआ मोटर्स इंडियाने आपली सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही २०२२ सोनेट आणि सेलटोसची अपडेटेड आवृत्ती लाँच केली आहे. या दोन्ही एसयूव्ही किआ मोटर्सच्या सर्वाधिक मागणी असलेल्या एसयूव्ही आहेत. नवीन सोनेट आणि सेलटोसमध्ये कंपनीने अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये दिली आहेत. या एसयूव्हीला इतर कंपनांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या पुढे ठेवतात. किआ २०२२ सोनेट आणि सेल्टसचे सर्व प्रकार चार एअरबॅगसह मिळणार आहेत. याचा अर्थ अपडेटेड सॉनेट आणि सेल्टोसला साइड एअरबॅग्ज देखील मिळतील. २०२२ सोनेट एचटीई म्हणजेच ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह बेस मॉडेलची किंमत ७.१५ लाख (एक्स शोरुम) रुपयांपासून सुरू होते. तर ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह २०२२ सेलटोस एचटीई व्हेरिएंटची किंमत १०.१९ लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते.
२०२२ सोनेटची वैशिष्ट्ये – सोनेट ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील लोकप्रिय कार आहे. नवीन सोनेटला आता किमान चार एअरबॅग मिळतील. याशिवाय इम्पीरियल ब्लू आणि स्पार्कलिंग सिल्व्हर या दोन नवीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय व्हेरियंटवर अवलंबून नवीन सोनेटला एक अपडेटेड ४.२ इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अर्ध-लेदर सीट आणि नवीन किा कनेक्ट लोगो मिळतो. व्हेरियंटमध्ये मागील-सीट बॅक फोल्डिंग नॉब, साइड एअरबॅग्ज आणि हायलाइन टायर-प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारख्या काही मानक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
तुम्ही मारूती सुझुकीची EECO गाडी घेतलीय का? कारण कंपनीने…
२०२२ सेलटोसची वैशिष्ट्ये – नवीन सेलटोसमधील सर्वात मोठे अपडेट म्हणजे त्यात iMT तंत्रज्ञानाची भर आहे. सेमी-ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम सोनेटवर आधीच उपलब्ध होती. तथापि, आयएमटीला डिझेल इंजिनसह जोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवीन सेलटोसमध्ये इम्पीरियल ब्लू आणि स्पार्कलिंग सिल्व्हर रंगाचे पर्याय आहेत. या कारमध्ये ग्रॅवेटी ग्रे प्लस आणि अरोरा ब्लॅक पर्लसारखी नवीन ड्युअल-टोन थीम देखील आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, नवीन सेलटोसला अपडेटेड साइड एअरबॅग्ज, ESC, VSM, BA, HAC, टायर-प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि ऑल-व्हील डिस्क ब्रेक सिस्टम मिळतात. याशिवाय पॅडल शिफ्टर्स आणि मल्टी-ड्राइव्ह आणि ट्रॅक्शन मोड आता खालच्या व्हेरियंटमध्येही उपलब्ध असतील.