Kia Seltos Launched Three Variants : किआ इंडिया या कंपनीने मार्केटमध्ये त्यांची अपडेटेड सेल्टोस आठ नवीन व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहेत, यामध्ये HTE (O), HTK (O) आणि HTK+ (O) या तीन नवीन पॉवरट्रेन पर्यायांचा (व्हेरिएंट) (Kia Seltos variants) समावेश असणार आहे. सेल्टोस हे दक्षिण कोरियन कंपनीचे सोनेट नंतरचे भारतातील दुसरे सर्वाधिक विक्री होणारे वाहन आहे. जानेवारी २०२५ मध्ये या वाहनांची ६,४७० युनिट्सची नोंदणी करण्यात यश आले होते, तर आता लाँच झालेल्या व्हेरिएंटनुसार एसयूव्ही ११.१३ लाख रुपयांपासून ते २०.५० लाख रुपयांपर्यंतच्या एक्स-शोरूमच्या किमतींसह एकूण २४ ट्रिम्समध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर प्रत्येक व्हेरिएंटची (Kia Seltos variants) खासियत काय, त्याची किंमत आणि फीचर्स काय असणार याबद्दल जाणून घेऊया…

२०२५ किआ सेल्टोस एचटीई (ओ) : 2025 Kia Seltos HTE (O) मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह ८ इंच टचस्क्रीन, तुमचे आवडते ट्रॅक बदलण्यासाठी, कॉल रिसीव्ह करण्यासाठी स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल, ६ स्पीकर साउंड सिस्टमसुद्धा असणार आहे. केबिनला पॉवर विंडो, हेडलाइट बीम समायोजित करण्यासाठी ऑटो कंट्रोल लाइट, हेडलॅम्प, टेल लॅम्प आणि डीआरएलसह सर्व एलईडी लाईट्स मिळतात. यामध्ये रिअर पार्किंग कॅमेरा (मागील पार्किंग कॅमेरा) सुद्धा असणार आहे. तसेच या व्हेरिएंटची किंमत ११.१३ लाख रुपये असणार आहे.

२०२५ किआ सेल्टोस एचटीके (ओ) : 2025 Kia Seltos HTK (O) मध्ये पॅनोरामिक सनरूफ, १६ इंचाचा अलॉय व्हील, स्टायलिश रूफ रेल आणि वॉशर आणि डिफॉगरसह रिअर वायपर आहे. यात स्मूथ क्रूझ कंट्रोल, इल्यूमिनेटेड पॉवर विंडो आणि मूड लॅम्प क्रुझ कंट्रोल, इल्यूमिनेटेड पॉवर विंडो, मूड लॅम्प सी/पॅड इन मोल्ड (साउंड मूड लॅम्पसह कॉम्बी),स्मार्ट की मोशन सेन्सर, टर्न सिग्नल एलईडी सिक्वेन्स लाइट्ससह एमएफआर एलईडी हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प देण्यात आला आहे. तसेच या व्हेरिएंटची किंमत १२.९९ लाख रुपये असणार आहे.

२०२५ किआ सेल्टोस एचटीके प्लस (ओ) : Kia Seltos HTK+(O) मध्ये १७ इंच अलॉय व्हील्स, एलईडी हेडलॅम्प sequential एलईडी इंडिकेटर, एलईडी फॉग लॅम्प, ग्लॉसी ब्लॅक रेडिएटर ग्रिल ऑटो-फोल्ड केलेले बाहेरील रीअरव्ह्यू मिरर्स, पार्सल ट्रे. तसेच प्रीमियम एस्थेटिक फीचर्ससाठी व्हेरियंटला क्रोम बेल्ट लाइन, फॉक्स लेदर फिनिश नॉब, ॲम्बियंट लाइटिंग आणि एक स्मार्ट कीसुद्धा देण्यात आली आहे. तसेच या व्हेरिएंटची किंमत १४.३९ लाख रुपये असणार आहे.

अपडेटेड सेल्टोसच्या ८ नवीन व्हेरिएंटमध्ये स्मार्टस्ट्रीम G1.5, स्मार्टस्ट्रीम G1.5T-GDI आणि D1.5 CRDi VGT इंजिन ऑप्शन उपलब्ध आहेत. ते पुढीलप्रमाणे… (Kia Seltos variants)

इंजिनट्रान्समिशनव्हेरिएंट (Kia Seltos variants )किंमत
स्मार्टस्ट्रीम G1.56 MTHTE (O)११,१२,९००
HTK१२,५७,९००
HTK (O)१२,९९,९००
HTK+ (O)१४,३९,९००
HTX१५,७५,९००
HTX (O)१६,७०,९००
स्मार्टस्ट्रीम G1.5T-GDI6 iMTHTK+१५,७७,९००
GTX+१९,९९,९००
7DCTGTX+ DT२०,१९,९००
X-Line२०,५०,९००
D1.5 CRDi VGT6 MTHTE (O) १२,७०,९००
HTK १४,०५,९००
HTK (O)१४,५५,९००
HTK+ (O) १५,९५,९००
HTX १७,३२,९००
HTX (O)१८,३५,९००
6 ATHTK+ (O) १७,२१,९००
HTX १८,६४,९००
GTX+१९,९९,९००
GTX+ २०,१९,९००
X-Line २०,५०,९००