किया इंडिया देशातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अनेक मॉडेल्स बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहेत. आता लवकरच किया इंडिया Kia Seltos 2023 चे लॉन्चिंग करणार आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये देशात लॉन्च झाल्यानंतर लोकप्रिय मध्यम आकाराच्या एसयूव्हीसाठी हे पहिले मोठे अपडेट असणार आहे.
सेलटॉस हे Kia चे भारतातील पहिले मॉडेल आहे. तसेच सर्वोच्च कार निर्मात्यांपैकी एक म्हणून आपले स्थान मजबूत करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. किया इंडिया सेलटॉस शिवाय सोनेट, केरेन्स आणि कार्निव्हल सारखी मॉडेल्सची विक्री करते. कियाने देशांतर्गत बाजारामध्ये सेलटॉसच्या ३,६४,११५ पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली आहे. तर कार निर्माती कियाने मध्य पूर्व, आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका, मेक्सिको आणि आशिया-पॅसिफिकसह जवळपास १०० बाजारपेठांमध्ये एसयूव्हीच्या १,३५,८८५ पेक्षा जास्त युनिट्सची निर्यात केली आहे. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.
हेही वाचा : VIDEO: KGF स्टार यशने खरेदी केली नवीन रेंज रोव्हर, किंमत वाचून व्हाल थक्क
Kia Seltos 2023 बद्दल बोलायचे झाल्यास या फेसलिफ्टेड SUV ला भारतात टेस्टिंगच्या वेळेस पाहिले गेले आहे. यामध्ये या एसयूव्हीच्या फ्रंट बंपरला खास डिझाईन बघायला मिळते. तसेच या सेल्टोस फेसलिफ्टला पूर्णपणे नवीन हेडलॅम्प मिळणार आहेत. ज्यामध्ये करण्यात आलेले इंटर्नल आणि एलईडी डे-टाईम रनिंग लॅम्प आणि मोठे ग्रील मिळणार आहेत. तसेच मागील बाजूस नवीन डिझाईन असलेले टेल गेट मिळेल. तसेच यामध्ये १७ इंचाचे अलॉय व्हील्स मिळतील. बाकी या एसयूव्हीच्या प्रोफाइलमध्ये फारसे बदल केलेले नाहीत.
सध्या किया सेलटॉस २०२३ च्या केबिनमध्ये कोणते बदल करण्यात आलेले आहेत हे स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह अधिक प्रगत इन्फोटेनमेंट मिळण्याची अपेक्षा आहे. ऑटोमॅटिक व्हेरिएंटमधील गिअर लिव्हर डेलद्वारे बदलले जाऊ शकते असे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. तसेच किया सेलटॉस २०२३ च्या सनरूफमध्ये केला जाऊ शकतो. सध्याच्या सेलटॉसमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ येते. Kia Seltos 2023 मध्ये पॅनोरॅमिक सनरूफ दिले जाऊ शकते. Kia Seltos 2023 ला प्रतिस्पर्धी असलेल्या Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara आणि Toyota Urban Cruiser Hyrider या एसयूव्हीमध्ये आधीपासूनच पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आला आहे.
सध्या Kia Seltos ची १०.८९ लाख ते १९.६५ लाख (एक्स-शोरूम ) रुपयांदरम्यान आहे. तर नवीन Kia Seltos 2023 ची नवीन किंमत ११ ते २१ (एक्स-शोरूम) लाख रूपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. दरम्यान नवीन Kia Seltos 2023 ४ जुलै रोजी लॉन्च होणार आहे.