Kia Car: किआ मोटर्स (Kia Motors) ही कोरियन वाहन उत्पादक कंपनी भारतीय बाजारात चांगलीच स्थिरावली आहे. ह्युंदाईची उपकंपनी असली तरी किआने आता भारतात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कंपनीची सेल्टॉस ही कार भारतीय बाजारात चांगली कामगिरी करत आहे. कंपनीने आता ही कार अपडेट केली असून ही मिड साईज एसयूव्ही लवकरच ‘Kia Seltos Facelift’ म्हणून लाँच करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. ही कार भारतीय बाजारात दाखल झाल्यानंतर टाटा आणि महिंद्रासह इतर कंपन्यांच्या मिड साईज एसयूव्हींशी स्पर्धा करेल. भारतीय वाहन बाजारात सध्या टाटा आणि महिंद्राचं वर्चस्व आहे.
काय असेल खास?
इंजिन
आपल्या या नवीन एसयूव्हीमध्ये कंपनी २.०-लिटर ४-सिलेंडर पेट्रोल इंजिन देऊ शकते. जे १४६bhp पॉवर आणि १७९Nm टॉर्क जनरेट करेल. ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह लाँच करू शकते.
(हे ही वाचा : खुशखबर: कार घेण्याचा विचार करताय? १ लाखात घरी आणा Maruti Dzire; पाहा कुठे मिळतेय डील )
फीचर्स
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात नवीन हेड लाइन, नवीन फ्रंट बंपर आणि नवीन फ्रंट ग्रिलसह बरेच कॉस्मेटिक अपडेट्स मिळू शकतात. तर याची बाहेरील बाजू सध्याच्या मॉडेलपेक्षा खूपच आकर्षक असेल. यामध्ये ग्राहकांना पूर्णपणे नवीन इंटीरियर लूक देखील पाहायला मिळेल. जे उत्कृष्ट डॅशबोर्ड डिझाइन, स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अपडेटेड कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह सुसज्ज असेल.
कधी होणार लाँच?
किआ मोटर्सची अपडेट केलेली ही मिड साईज एसयूव्ही ‘Kia Seltos Facelift’ पुढील वर्षी २०२३ मध्ये लाॅंच होण्याची शक्यता आहे.