देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कार निर्मात्यांपैकी एक असलेल्या दक्षिण कोरियाची ऑटोमेकर Kia ने २०१९ मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि कंपनीने आपली ‘Seltos SUV’ ही पहिली कार म्हणून देशात सादर केली. हा ब्रँड बाजारात येताच त्याने ग्राहकांमध्ये आपली पकड निर्माण करण्यास सुरुवात केली. डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात, Kia India ने वाहन विक्रीत ९४.७ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे, ज्या दरम्यान कंपनीने एकूण १५,१८४ वाहनांची विक्री केली आहे.
कंपनीने केली ८ लाख वाहनांची विक्री
Kia India ने वर्ष २०२२ मध्ये एकूण वाहन विक्रीत ३,३६,६१९ युनिट्सची नोंद केली, वर्ष २१ च्या तुलनेत ४७.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. ब्रँडची देशांतर्गत डिस्पॅच २,५४,५५६ युनिट्सवर होती, ज्याने वर्ष-दर-वर्ष ४०.१ टक्क्यांची वाढ नोंदवली आणि वर्ष २०२२ मध्ये ८२,०६३ युनिट्सची निर्यात केली. ऑगस्ट २०१९ मध्ये, कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले कार्य सुरू केले, त्यानंतर आतापर्यंत एकूण ८ लाख वाहनांची विक्री झाली आहे. Kia India चा दावा आहे की, वर्ष २०२२ मध्ये देशातील सर्वात मोठा (युटिलिटी व्हेईकल) निर्यातदार बनला आहे, या कालावधीत एकूण ८२,०६३ वाहनांची निर्यात केली आहे.
(हे ही वाचा << २५ हजारामध्ये खरेदी करा ८० kmpl पर्यंत मायलेज देणारी ‘ही’ जबरदस्त बाईक; पाहा कुठे मिळतेय शानदार डील )
या वाहनांना मोठी मागणी
भारतीय बाजारपेठेत Kia स्थापन करण्यात सेल्टोसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीने शेअर केलेल्या माहितीनुसार, Seltos ने देशांतर्गत बाजारात वर्ष २२ मध्ये एकूण १,०१,५६९ युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आणि Sonet ने यावर्षी ८६,२५१ युनिट्सची विक्री नोंदवली. केर्न्सने ६२,७५६-युनिट विक्री नोंदवली आणि कार्निव्हल आणि EV6 ने अनुक्रमे ३,५५० आणि ४३० युनिट्सची विक्री नोंदवली.
तीनच वर्षात गाठला मोठा पल्ला
किआ इंडियाचे मुख्य विक्री अधिकारी हरदीप सिंग बराड म्हणाले, “किया इंडियासाठी वर्ष २०२२ हे सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. या वर्षी ग्राहकांकडून खूप प्रेम मिळाले. ब्रँड किमतीत वाढ आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यासारख्या अनेक समस्या असूनही विक्रीच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.” ब्रँडने भारतात तीन वर्षे पूर्ण केली असून आतापर्यंत देशांतर्गत बाजारात ६.२२ लाख युनिट्सची विक्री केली आहे आणि १.७८ लाख युनिट्स इतर देशांमध्ये निर्यात केली आहेत, यासह कंपनीने ३.५ वर्षांत ८ लाख वाहनांची विक्री केली आहे.
…म्हणून आहे ‘ही’ खास
Kia Seltos SUV ची खासियत म्हणजे, या कारमध्ये ६ एअरबॅग, एबीएस, ईएससी, हील स्टार्ट असिस्टंट, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर आणि ब्लाइंड स्पॉट व्यू मॉनिटर देण्यात आला आहे. या कारमध्ये ३ इंजिन ऑप्शन आहे. कारमध्ये १.५ लीटर,४ सिलेंडर पेट्रोल इंजिन, १.४ लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि १.५ लीटर डीझेल इंजिन आहे.