दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी Kia Motors ने भारतात मोठी उपलब्धी मिळवली आहे. भारतीय वाहन बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कार निर्माता कंपनी किया नवनवीन कार लाँच करीत असते. कियाच्या कारही भारतीय बाजारात खूप पसंत केल्या जातात. जबरदस्त फीचर्स, लूक, डिझाईन यामुळे ग्राहक वर्ग याकारकडे आकर्षित होत असतो. आता कंपनीच्या एका कारने मोठा विक्रम नोंदविला आहे. कारची भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. चला तर जाणून घेऊया कोणती आहे ही, कार आणि या कारची वैशिष्ट्ये कोणती…?

Kia ची लोकप्रिय कार SUV Sonet नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरते. Kia च्या कॉम्पॅक्ट SUV Sonet लाँच झाल्यापासून ४४ महिन्यांत एकूण ४ लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये भारत आणि परदेशी दोन्ही बाजारांचा समावेश आहे. त्यापैकी ३ लाख १७ हजारांहून अधिक वाहने भारतात विकली गेली आहेत, तर ८५ हजारांहून अधिक वाहनांची निर्यात झाली आहे. अत्यंत स्पर्धात्मक कॉम्पॅक्ट एसयूव्ही मार्केटमध्ये किया सोनेट त्याच्या अनोख्या डिझाइन, प्रभावी वैशिष्ट्ये आणि प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभवासाठी लोकप्रिय आहे.

new ST buses in phased manner 110 buses have been made available
एसटीच्या नवीन गाड्या मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चुरस… तोटा झाल्यास सरकारकडून…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
car
Maruti Suzuki Price Hike: १ फेब्रुवारीपासून मारुती सुझुकीच्या कार महागणार! कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे?
Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
What is best time to change car engine oil for maximum performance
कार घेतलीय पण ‘ही’ गोष्ट अजूनही माहित नाही! जाणून घ्या, गाडीचे ‘इंजिन ऑइल’ किती दिवसांनी बदलावे…
Three injured as speeding car hit 5 vehicles
मोटारीची पाच वाहनांना धडक; सांगलीजवळ तिघे जखमी
Maruti Suzuki car price loksatta news,
‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ
man sold car gifted by friend and buy an ambulance
असेही औदार्य! मित्रांनी भेट दिली कार, ती विकून घेतली रुग्णवाहिका…

(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ ५ सीटर कारसमोर Wagon R ही विसरुन जाल! खरेदीसाठी मोठी गर्दी; मायलेज २७ किमी, वेटिंग पीरियड पोहोचला… )

ही कार भारतात प्रथमच सप्टेंबर २०२० मध्ये लाँच करण्यात आले. भारतात लाँच होणारी ही तिसरी Kia कार होती. लाँच झाल्यापासून ४४ महिन्यांत, ६३ ग्राहकांनी सनरूफसह सोनेट खरेदी केले आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, ३७ टक्के ग्राहकांनी १.५L डिझेल इंजिन निवडले आहे, तर ६३ टक्क्यांनी ग्राहकांना पेट्रोल इंजिन प्रकार आवडला आहे.

आता अधिकाधिक ग्राहक स्वयंचलित वाहनांकडे वळू लागले आहेत. Sonet मध्ये उपलब्ध ७DCT ट्रान्समिशन खूप पसंत केले जात आहे, २०२० पासून त्याची विक्री ३७.५ टक्क्यांनी वाढली आहे. एकंदरीत, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (७DCT आणि ६AT) प्रकारांचा सोनेटच्या एकूण विक्रीपैकी २८ टक्के वाटा आहे, तर iMT प्रकारांचा वाटा २३ टक्क्यांनी आहे.

या कारची किंमत ७.९९ लाख रुपये ते १५.७५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात तीन इंजिन पर्याय आहेत. १-लिटर टर्बो-पेट्रोल (१२०PS/१७२Nm), १.२-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल (८३PS/११५Nm) आणि १.५-लिटर डिझेल (११६PS/२५०Nm). त्यांच्यासोबत अनेक गिअरबॉक्स पर्याय येतात. त्याचे डिझेल इंजिन (१.५-लिटर डिझेल iMT) २२.३kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते.

Story img Loader