दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी Kia Motors ने भारतात मोठी उपलब्धी मिळवली आहे. भारतीय वाहन बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कार निर्माता कंपनी किया नवनवीन कार लाँच करीत असते. कियाच्या कारही भारतीय बाजारात खूप पसंत केल्या जातात. जबरदस्त फीचर्स, लूक, डिझाईन यामुळे ग्राहक वर्ग याकारकडे आकर्षित होत असतो. आता कंपनीच्या एका कारने मोठा विक्रम नोंदविला आहे. कारची भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. चला तर जाणून घेऊया कोणती आहे ही, कार आणि या कारची वैशिष्ट्ये कोणती…?
Kia ची लोकप्रिय कार SUV Sonet नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरते. Kia च्या कॉम्पॅक्ट SUV Sonet लाँच झाल्यापासून ४४ महिन्यांत एकूण ४ लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये भारत आणि परदेशी दोन्ही बाजारांचा समावेश आहे. त्यापैकी ३ लाख १७ हजारांहून अधिक वाहने भारतात विकली गेली आहेत, तर ८५ हजारांहून अधिक वाहनांची निर्यात झाली आहे. अत्यंत स्पर्धात्मक कॉम्पॅक्ट एसयूव्ही मार्केटमध्ये किया सोनेट त्याच्या अनोख्या डिझाइन, प्रभावी वैशिष्ट्ये आणि प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभवासाठी लोकप्रिय आहे.
(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ ५ सीटर कारसमोर Wagon R ही विसरुन जाल! खरेदीसाठी मोठी गर्दी; मायलेज २७ किमी, वेटिंग पीरियड पोहोचला… )
ही कार भारतात प्रथमच सप्टेंबर २०२० मध्ये लाँच करण्यात आले. भारतात लाँच होणारी ही तिसरी Kia कार होती. लाँच झाल्यापासून ४४ महिन्यांत, ६३ ग्राहकांनी सनरूफसह सोनेट खरेदी केले आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, ३७ टक्के ग्राहकांनी १.५L डिझेल इंजिन निवडले आहे, तर ६३ टक्क्यांनी ग्राहकांना पेट्रोल इंजिन प्रकार आवडला आहे.
आता अधिकाधिक ग्राहक स्वयंचलित वाहनांकडे वळू लागले आहेत. Sonet मध्ये उपलब्ध ७DCT ट्रान्समिशन खूप पसंत केले जात आहे, २०२० पासून त्याची विक्री ३७.५ टक्क्यांनी वाढली आहे. एकंदरीत, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (७DCT आणि ६AT) प्रकारांचा सोनेटच्या एकूण विक्रीपैकी २८ टक्के वाटा आहे, तर iMT प्रकारांचा वाटा २३ टक्क्यांनी आहे.
या कारची किंमत ७.९९ लाख रुपये ते १५.७५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात तीन इंजिन पर्याय आहेत. १-लिटर टर्बो-पेट्रोल (१२०PS/१७२Nm), १.२-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल (८३PS/११५Nm) आणि १.५-लिटर डिझेल (११६PS/२५०Nm). त्यांच्यासोबत अनेक गिअरबॉक्स पर्याय येतात. त्याचे डिझेल इंजिन (१.५-लिटर डिझेल iMT) २२.३kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते.