Kia syros: किआ आपली पुढील कॉम्पॅक्ट SUV Kia Syros १९ डिसेंबर रोजी भारतात लाँच करणार आहे. आधी कंपनीचा Sonet हा एकमेव कॉम्पॅक्ट सेग्मेंट असायचा; पण आता या सेग्मेंटमध्ये Syros चं नाव समाविष्ट होणार आहे. ही SUV लाँच होण्यापूर्वी त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ या…

किआ इंडिया कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेग्मेंटमध्ये एक शक्तिशाली प्रॉडक्ट म्हणून Syros लाँच करणार आहे. जास्तीत जास्त केबिन स्पेससाठी, फ्लॅट रूफ व बॉक्सी डिझाइन या कारमध्ये दिसू शकते.

devendra fadnavis on sudhir mungantiwar
Devendra Fadnavis : “…म्हणून सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात घेतलं नाही”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ravi Rana, Navneet Rana, Badnera , Ravi Rana No Minister post,
राणा दाम्पत्याच्या महत्वाकांक्षेला राजकीय लगाम
Triumph Speed ​​T4
Triumph Speed T4: ट्रायम्फची शक्तीशाली बाईक एवढ्या रुपयांनी झाली स्वस्त, स्टॉक संपण्याआधी ऑफरचा घ्या लाभ
What sudhir Mungantiwar Said?
Sudhir Mungantiwar : मंत्रिपद नाकारल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांना प्रमोद महाजनांची आठवण, “कितीही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरीही…”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Chhagan Bhujbal
“हो, मी नाराज आहे”, मंत्रिपदापासून वंचित ठेवलेल्या भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “मला फेकल्यामुळे…”
Dhananjay Munde On Chhagan Bhujbal
Dhananjay Munde : छगन भुजबळांच्या नाराजीवर धनंजय मुंडेंचं मोठं विधान; म्हणाले, “अजित पवार स्वत:…”

अ‍ॅडव्हान्स फीचर्स

नवीन Syros मध्ये मोठा इन्फोटेन्मेंट डिस्प्ले, वायरलेस चार्जर, टाईप C चार्जिंग पोर्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, नवीन स्टेअरिंग व्हील, मोठा सेंटर कन्सोल, रिअर एसी व्हेंट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, रिक्लाइनिंग रियर सीट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज, सहा स्पीकरसह ऑडिओ सिस्टीम EBD आणि ब्रेक असिस्ट यांसारख्या सुविधा मिळू शकतात.

हेही वाचा… स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत

इंजिन

इंजिनाबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Kia Syros मध्ये १.२ लिटर पेट्रोलवरील इंजिन मिळू शकते, जे मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह येईल. ही SUV एका लिटरमध्ये 18-20kmpl मायलेज देऊ शकते. तुम्हाला यामध्ये CVT गिअरबॉक्सचा पर्यायदेखील मिळेल, अशी अपेक्षा आहे.

या एसयूव्हीचे डिझाइन बॉक्सी असू शकते. बाह्य डिझाइनला प्रीमियम फील देण्यासाठी, एलईडी हेडलॅम्प DRL, फ्लश-फिटिंग डोअर हॅण्डल, स्क्वेअर-ऑफ व्हील आर्च, लाग रूफ रेल व ब्लॅक-आउट सी-पिलर आहेत. तसेच Kia Syrosच्या केबिनबद्दल बोलायचं झालं, तर त्यात सेल्टोस एसयूव्हीसारखी केबिन पाहायला मिळते. तर त्यात ड्युअल-टोन इंटेरियर थीम पाहिली जाऊ शकते. सध्या २-स्पोक स्टेअरिंग व्हीलचे युग आहे. त्यामुळे या नवीन एसयूव्हीमध्येही तेच स्टेअरिंग व्हील उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा… महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स

कंपनी ही कार किफायतशीर किमतीत लाँच करू शकते. त्याची नुकत्याच लाँच झालेल्या स्कोडा Kylaq सोबत थेट स्पर्धा होईल, जी पुढील आठवड्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

तसेच, इतर कॉम्पॅक्ट SUV जसे Venue, Nexon, XUV3XO व Brezza याही शर्यतीत आहेत. पण हेदेखील खरं आहे की, किआसाठी हा मार्ग सोपा असणार नाही. कारण- बाजारात पर्यायांची कमतरता नाही. दरम्यान, किआच्या या नव्याकोऱ्या Syros ची किंमत १९ डिसेंबरला जाहीर होईल.

Story img Loader