Kia Syros Booking Start : किया मोटर्स इंडिया या दक्षिण कोरियन ब्रँडच्या भारतीय बाजारपेठेने नवीन एसयूव्ही किया सिरोस (Kia Syros) १९ डिसेंबर २०२४ रोजी ग्राहकांसमोर आणली. तर कंपनीच्या एसयूव्हीसाठी प्री बुकिंग आज रात्री १२ वाजल्यापासून सुरू होईल. ग्राहक २५ हजार रुपये टोकन रक्कम भरून एसयूव्ही बुक करू शकतात. पण, तुम्ही बुकिंग करण्यापूर्वी त्यात कोणते फीचर्स आहेत हे आपण जाणून घेऊया…
किया सिरोस (Kia Syros) मध्ये कॉंटेम्पोररी डिझाइन आहे, ज्यामध्ये व्हर्टिकल स्टॅक केलेले हेडलॅम्प, डेटाइम रनिंग लाइट्स (DRLs) बरोबर मजबूत दिसणारे बंपर आहेत. हे फीचर्स ब्रँडच्या फ्लॅगशिप EV9 मॉडेलच्या डिझाईनपासून प्रेरित झाल्याचे दिसते आहे. शिवाय ब्रँडने नवीन अलॉय व्हील डिझाइनचे अनावरण केले आहे. मागील स्टाइलिंग समोरच्या डिझाइनशी समांतर आहे, ज्यामध्ये L-आकाराचे LED टेल लाइट्स आहेत, जे मागच्या बाजूला खूप उंच ठेवलेले आहेत.
किया सिरोस (Kia Syros) मध्ये इंटेन्स रेड, फ्रॉस्ट ब्लू, प्युटर ऑलिव्ह, अरोरा ब्लॅक पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, इम्पीरियल ब्लू, ग्लेशियर व्हाइट पर्ल आणि स्पार्किंग सिल्व्हर यांसारखे रंग पर्याय, गाडीची लांबी ३,९९५ मिमी, रुंदी १,८०० मिमी आणि उंची १,६५५ मिमी आहे. व्हीलबेसची रुंदी २,५५० मिमी आहे. त्याचप्रमाणे एसयूव्ही ४६५ लिटरची बूटस्पेस देते.
हेही वाचा…2025 Honda SP 160 : होंडाची नवीन बाईक लाँच! कमी बजेटमध्ये मिळेल पावरफुल इंजिन; एकदा फीचर्स बघाच
३६० डिग्री कॅमेरा, सहा एअरबॅग्ज अन् बरेच काही
SUV वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, पॉवर-ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, वायरलेस चार्जिंग, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, एअर कंडिशनिंग कंट्रोल्ससाठी स्क्रीन, हार्मोन कार्डन यांसारखे फीचर्स आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ६०:४० स्प्लिट सीट, वाहनामध्ये ३६० डिग्री कॅमेरा, सहा एअरबॅग्ज, हिल स्टार्ट असिस्ट, लेव्हल 2 ADAS संच आणि अतिरिक्त तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या सर्व ऑफर सहा ट्रिम स्तरांमध्ये विभागल्या आहेत, ज्यामध्ये HTX+(O), HTX+, HTX, HTK+, HTK(O), आणि HTK आदींचा समावेश आहे.
Kia Syros मध्ये १.० लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे ११८ bhp आणि १७२ Nm पीक टॉर्क जनरेट करते. याव्यतिरिक्त १.५ लिटर डिझेल इंजिनसाठी पर्याय असेल, जे ११३ hp आणि २५० Nm पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ६ स्पीड मॅन्युअल, ७ स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन आणि ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स समाविष्ट आहे.