Kia Syros launched: दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Kia ने काल १९ डिसेंबर रोजी अधिकृतपणे आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV Kia Syros भारतीय बाजारात लाँच केली आहे. ही एक मध्यम आकाराची बी-सेगमेंट एसयूव्ही आहे, जी सेल्टोस आणि सोनेट यांच्यामधल्या रेंजमधील असेल.

मार्केटमध्ये ही एसयूव्ही टाटा पंच, नेक्सॉन, मारुती ब्रेझा, ह्युंदाई एक्सेंट यांसारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करील. सध्या कंपनीने फक्त ही SUV प्रदर्शित केली आहे; पण तिच्या किमती अजून जाहीर केलेल्या नाहीत. पुढील महिन्यात जानेवारीत होणाऱ्या भारत मोबिलिटी एक्स्पोदरम्यान त्याच्या किमती जाहीर केल्या जातील आणि त्याची डिलिव्हरी फेब्रुवारीपासून सुरू होईल.

kalyan dispute news akhilesh shukla video
Kalyan Dispute: कल्याण मारहाण प्रकरणी अखेर अखिलेश शुक्लांनी दिलं स्पष्टीकरण; देशमुख कुटुंबानंच पत्नीला शिवीगाळ केल्याचा आरोप!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
ajit pawar on kalyan society scuffle viral video news
Video: “तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला…”, कल्याण मारहाण प्रकरणी अजित पवारांनी विधानसभेत मांडली भूमिका!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आला तर..”, रहिवाश्यांचा संताप, वैयक्तिक वाद विकोपाला!
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं नॉनव्हेज खाणाऱ्यांना घरे नाकारणाऱ्यांबद्दल मोठं वक्तव्य; सरकारची भूमिका मांडताना म्हणाले…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
jitendra awhad
Somnath Suryavanshi : “अदृश्य शक्तींनी सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली”, शवविच्छेदन अहवालावरून जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत
Assembly elections vidhan sabha Kunbi Maratha Number of Maratha MLA
विधानसभेत मराठा वर्चस्वाला शह; ओबीसींना बळ

लूक आणि डिझाइन

Kia Syros च्या पुढील भागात उच्च-सेट बोनेट आहे. तसेच, मोठ्या एलईडी डीआरएलसह उभ्या एलईडी हेडलाइट्स दिल्या गेल्या आहेत. बंपरमध्ये फॉक्स स्किड प्लेटसाठी सिल्व्हर एलिमेंट आणि एडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (ADAS)साठी रडार मॉड्युल दिसू शकतं. एकूणच, या एसयूव्हीचा पुढचा भाग खूपच प्रभावी दिसत आहे.

हेही वाचा… मारुती, टाटाची उडाली झोप! Kiaची ‘ही’ कॉम्पॅक्ट SUV होतेय लॉंच, दमदार इंजिनसह मिळणार कमाल फिचर्स

साईड प्रोफाईलबद्दल सांगायचे तर, लांब रूफ रेल, फ्लश डोअर हॅण्डल, चंकी बी-पिलर व ब्लॅक बॉडी क्लेडिंगसह १७-इंचांचा अलॉय व्हील दिला जाऊ शकतो. चाकांवर आयताकृती आकाराचे बॉडी क्लेडिंग देण्यात आले आहे. मागे एक मोठा क्वार्टर ग्लास देण्यात आला आहे. ही एसयूव्ही पाहिल्यावर तुम्हाला मारुती वॅगनआरची आठवण करून देईल.

पॉवर आणि परफॉर्मन्स

Kia Syros साठी पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह ऑफर करण्यात आली आहे. त्यात १.५-लिटर डिझेल इंजिन आहे, जे 115bhp पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करते. तर पेट्रोल पर्यायामध्ये 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे, जे 120bhp पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल, 7-स्पीड DCT व 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशन गिअर बॉक्ससह दिले जात आहे.

हेही वाचा… स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत

केबिन आहे विलक्षण

Kia Syros चे केबिन कंपनीच्या इतर गाड्यांप्रमाणेच आलिशान आहे. त्यात ३० इंच पॅनोरॅमिक स्क्रीन सेटअप आहे (एक इन्फोटेन्मेंटसाठी आणि दुसरा इन्स्ट्रुमेंटेशनसाठी); जो वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते.

फीचर्स

या SUV मध्ये पुढे आणि मागे व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर ड्रायव्हर सीट, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, प्रीमियम ऑडिओ सिस्टीम, ॲम्बियंट लायटिंग आणि मागे एसी व्हेंट यांसारखी काही खास फीचर्स दिली गेली आहेत. त्याशिवाय सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी सहा एअरबॅग्ज आणि लेव्हल-2 ADAS सूट मिळेल, जो सेल्टोसमध्ये आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), रिअर पार्किंग सेन्सर, हिल-होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, स्पीड अलर्ट सिस्टीम, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेजसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS)सारखी फिचर्स असतील.

Story img Loader