Kia EV9 Electric SUV Unveiled Globally: इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत, ई-कार, जी हॅचबॅक आणि मध्यम आकाराच्या सेडानपुरती मर्यादित होती, ती आता एसयूव्ही सेगमेंटमध्येही दस्तक देत आहे. आता अशीच एक SUV Kia ने शोकेस केली आहे. कोरियन ऑटो निर्मात्याने आपली सर्वोत्तम इलेक्ट्रिक SUV EV9 चे अनावरण केले आहे. ऑटो एक्सपो २०२३ मध्ये कंपनीने ही एक कॉन्सेप्ट कार म्हणून दाखवली असली तरी त्याबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
तथापि, कंपनीने अद्याप त्याची किंमत आणि लाँच तारखेबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. पण २०२४ पर्यंत कंपनी ही कार बाजारात उतरवेल असे मानले जात आहे. तथापि, ते आधी आशियाई बाजारात लाँच केले जाईल की युरोपियन बाजारात याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही.
(हे ही वाचा : ९.१४ लाखांच्या मारुतीच्या ‘या’ कारने Tata Nexon अन् Venue चं संपवलं वर्चस्व, खरेदीसाठी ग्राहक रांगेत)
‘या’ कारचे चार उत्तम वैशिष्ट्ये
ही कार १९, २० आणि २१ इंच व्हील पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यात ६४kWh ची बॅटरी पॅक मिळू शकतो. ज्याला केवळ ७ मिनिटात २० ते ८० टक्के पर्यंत चार्ज करता येवू शकते. इलेक्ट्रिक SUV ला ड्युअल मोटर सेटअप आणि 4WD (फोर-व्हील ड्राइव) ड्राइवट्रेन सिस्टम सोबत आणले जाण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रिक असूनही ही कार ऑल व्हील ड्राइव्ह प्रणालीसह लॉन्च केली जाईल. कार २ इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे चालविली जाईल. Kia EV9 च्या रेंजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक SUV एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ४८३ किलोमीटरची रेंज देते. कंपनी याला ६ आणि ७ सीटर पर्यायांमध्ये आणणार आहे.
कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात दोन टोन डॅशबोर्ड, मोठा सेंट्रल कन्सोल, दोन स्पोक मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, १२.३ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, तितकेच मोठे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल.
दुसरीकडे, जर आपण कारच्या बाह्य भागाबद्दल बोललो तर, तिला फ्लॅट बोनेट, अरुंद लोखंडी जाळी तसेच एस शेप डीआरएल, स्वॅप बॅक हेडलॅम्प, छतावरील रेल, ब्लॅक पिलर, शार्क फिन अँटेना, रॅक केलेले विंडस्क्रीन असे अनेक उत्कृष्ट लुक मिळतील.