Kinetic Green Zulu electric scooter: इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कायनेटिक ग्रीन या भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने मुंबईतील एका कार्यक्रमात आपली नवीन मेड इन इंडिया इलेक्ट्रिक स्कूटर, ‘Kinetic Green Zulu’ सादर केली आहे. येत्या काही वर्षांत आम्ही लवकरच आपल्या ग्राहकांसाठी आणखी नव्या दुचाकी बाइक्स विकसित करू, असे या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना कायनेटिक ग्रीनच्या संस्थापिका व सीईओ सुलाज्जा फिरोदिया यांनी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Kinetic Green Zulu इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये काय आहे खास?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक स्कूटर ६० किमी प्रतितासाचा टॉप स्पीड देते. त्याशिवाय इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप रेंज १०४ किलोमीटर आहे आणि या इलेक्ट्रिक स्कूटरला चार्जिंग करण्यासाठी पाच तास लागतात. या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी २.२७ kwh आहे. त्याशिवाय स्कूटरमध्ये एलईडी डीआरएल देण्यात आले आहे.

त्याशिवाय या इलेक्ट्रिक स्कूटरच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे, तर या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि समोर बॅग हुकूआहे. त्याचबरोबर कंपनीने साइड स्टॅण्ड सेन्सर दिला आहे. त्याशिवाय ऑटो कट चार्जर, फ्रंट व रीअर डिस्क ब्रेक, फ्रंटमध्ये स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे.

(हे ही वाचा : मारुती अन् टाटानंतर आता ‘या’ कंपनीचा ग्राहकांना दणका, गाडीच्या किमती वाढणार; स्वस्तात कार खरेदीची संधी कधीपर्यंत?)

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फ्रंट व रीअर डिस्क ब्रेक्स, अंडर-सीट स्टोरेज, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल), डिजिटल स्पीडोमीटर, फ्रंट स्टोरेज स्पेस, फ्रंट बॅग हूक, स्टायलिश ग्रॅब रेल, ऑटो पॉवर कट चार्जर, यूएसबी पोर्ट आणि एक बूट लाइट देण्यात आलं आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर पिक्सेल व्हाईट, इन्स्टा ऑरेंज, यूट्युब रेड, ब्लॅक एक्स, एफबी ब्ल्यू आणि क्लाउड ग्रे या सहा रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे.

(हे ही वाचा : Ertiga ची उडाली झोप, ‘ही’ सात सीटर कार घेण्यासाठी मोठी गर्दी; प्रचंड मागणी पाहून कंपनीला बंद करावं लागलं बुकिंग )

४९९ रुपयांमध्ये करता येणार बुकींग

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक केवळ ४९९ रुपयांच्या किमतीत ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकतात. या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९४,९९० (एक्स-शोरूम, मुंबई) रुपये आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरवर पाच वर्षांची वॉरंटीदेखील मिळते. नवीन ई-स्कूटर, ZULU आता देशभरातील सर्व Kinetic Green डीलरशिपवर आणि Amazon आणि Flipkart वर उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kinetic green has launched the new zulu electric scooter in india priced at rs 000 exshowroom pdb