अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आज अथिया व राहुल विवाहबंधनात अडकणार आहेत. या शाही विवाहसोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर हा विवाहसोहळा पार पडणार आहे. आज आपण या दोघांकडे असणाऱ्या कार कलेक्शनवर एक नजर टाकूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Lamborghini Huracan Spyder

केएल राहुलकडे लॅम्बोर्गिनी हुराकन स्पायडर ही जगातील सर्वात महागडी कार आहे. ते फक्त २.६ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग पकडू शकते. कारमध्ये ५.३-लीटर V१० इंजिन दिलेले आहे, जे ६३१ hp पॉवर आणि ५६५ Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते. भारतात या कारची किंमत सुमारे ५ कोटी रुपये आहे.

(हे ही वाचा: तगड्या फीचर्सनी भरलेल्या Maruti च्या कारची देशात धूम; ७ दिवसांतच मिळालं ५,००० हून अधिक बुकिंग)

BMW 5 Series

केएल राहुलकडे BMW 5-सीरीज देखील आहे, ज्याच्या नंबर प्लेटवर ‘KLR’ लिहिलेले आहे. या सेडानमध्ये ३.०-लिटर डिझेल इंजिन आहे जे ६०० Nm पीक टॉर्क आणि २६५ hp कमाल पॉवर निर्माण करू शकते. या कारचा टॉप स्पीड २५० किमी प्रतितास आहे. त्याची किंमत सुमारे ७० लाख रुपये आहे.

Aston Martin DB11

Lamborghini व्यतिरिक्त KL राहुलकडे Aston Martin DB11 सुपरकार देखील आहे. ही ६३० hp आणि ७०० Nm पीक पॉवर आणि टॉर्क आउटपुटसह ५.२-लिटर V12 इंजिनद्वारे समर्थित आहे. ते केवळ ३.५ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेगाने धावू शकते. भारतात त्याची किंमत ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

(हे ही वाचा: 300 किमी रेंज अन् आधुनिक फीचर्सने रंगलेल्या इलेक्ट्रिक कारचे करा ‘इतक्या’ रुपयांत बुकिंग)

Mercedes Benz C-43

केएल राहुलकडे ७५ लाखांपेक्षा जास्त किमतीची मर्सिडीज-बेंझ सी४३ ही आलिशान कूप आहे. कारमध्ये पॉवरचीही कमतरता नाही आणि ती ४.२ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग गाठू शकते. हे ३.०-लिटर V6 इंजिनद्वारे समर्थित आहे, जे ५२० Nm पीक टॉर्क आणि ३८४ hp कमाल पॉवर निर्माण करू शकते.

Range Rover Velar

क्रिकेटरकडे लक्झरी एसयूव्ही रेंज रोव्हर वेलार देखील आहे. या SUV मध्ये २.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह, ३६५ Nm चा पीक टॉर्क आणि २५० hp ची कमाल पॉवर उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत सुमारे १ कोटी रुपये आहे.