देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार मारुती सुझुकी ईको या कारला बाजारात मोठी मागणी आहे. हा कार मोठ्या कुटुंबासाठी बनवण्यात आली आहे. ज्यांचे कुटुंब मोठे आहे, त्यांच्यासाठी ही बेस्ट कार आहे. छोट्या शहरात आणि गावात या कारला खूप पसंत केले जाते. मारुती सुझुकी ईको मॉडलची दिल्ली एक्स शोरूम किंमत ४ लाख ९२ हजार २०० रुपये आहे. ऑन रोड किंमत ५ लाख ४९ हजार ८७६ रुपये आहे. मारुती सुझुकी ईको खरेदीचा विचार करत असाल, तर मग जाणून घ्या फायनान्स प्लॅन…
- जर तुम्ही कॅश पेमेंटद्वारे मारुती इको खरेदी करत असाल तर तुमच्याकडे पाच लाख रुपये असणे आवश्यक आहे, परंतु फायनान्स प्लॅनद्वारे या कारला खरेदी करण्यासाठी तुम्हाला फक्त ५२ हजार रुपये मोजावे लागतील.
- ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरच्या गणनेनुसार, या कार कर्जासाठी अर्ज केल्यावर, बँक ४,६६,७२७ रुपये कर्ज देईल आणि बँक या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के व्याजदर आकारेल.
- कर्जाची रक्कम मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला या कारसाठी किमान ५२,००० रुपये डाउन पेमेंट भरावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी दरमहा ९,८७१ रुपये मासिक ईएमआय जमा करावे लागेल.
मारुती सुझुकी ईकोचे फिचर्स
ईकोमध्ये डुअल टोन इंटीरियरसह एसी, शानदार केबिन स्पेस, रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट सिस्टिम, सीट बेल्ट रिमायंडरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार पेट्रोलसह सीएनजी पर्यायात देखील येते. ही कार किमतीसह इंधनावरदेखील बचत करेल. यामध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन मिळते. ही कार १६.११ kmpl चा मायलेज देते, असा कंपनीची दावा आहे.