Second Hand Car Benefit: कार खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. लोक फक्त नवीन कार घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना नवीन कार परवडत नाही आणि ते सेकंड हँड कार घेण्याचा विचार करतात. जुनी कार घेण्याचा विचार करताच लोकांच्या मनात असाही विचार येतो की, जर गाडी लवकर खराब झाली तर तिच्या सर्व्हिसिंगसाठी जास्त पैसे लागणार नाहीत. इतर अनेक गोष्टी मनात येतात. जुनी कार घेण्याचे तोटे आपल्या सर्वांना माहीत आहेत, पण आज आम्ही तुम्हाला सेकंड हँड कार घेण्याचे फायदे काय आहेत हे सांगणार आहोत.

बाजारपेठेत वाढले सेकंड हैंड कारच्या विक्रीचे प्रमाण

भारतीय मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वापरलेल्या सेकंड हैंड कारच्या विक्रीचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. नव्या कार खरेदी करण्यासोबतच जुन्या कार खरेदी करण्यावरही लोकांचा भर दिसतो आहे. खरे तर सर्वसाधारणपणे जुन्या कार खरेदी करणे म्हणजे डोक्याला तापवून घेणे अशी धारणा आहे. मात्र, असे मुळीच नाही जर तुम्ही पूर्ण विचार करून आणि कार कुठल्या परिस्थितीत आहे हे नीट तपासून व्यवहार केला तर कुठलेही नुकसान संभवत नाही. चला तर मग जाणून घेऊया सेकंड हँड कार घेण्याचे फायदे कोणते आहेत.

loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Susheela Sujeet New Marathi Movie
दरवाजाच्या आड काय आहे गुपित? ‘सुशीला- सुजीत’ सिनेमाचं पोस्टर चर्चेत, पहिल्यांदाच एकत्र झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी
Kalyan Crime News
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”
Ravi Rana amravati unhappy, Ravi Rana latest news,
Ravi Rana : रवी राणांची नाराजी कायम; अधिवेशनात उपस्थित न राहता गोसेवेत व्यस्त

(हे ही वाचा : जुन्या टू-व्हीलरचं आता नो टेन्शन! ‘इतक्या’ कमी खर्चात EV मध्ये होणार कन्वर्ट; जाणून घ्या कसं?)

सेकंड हँड कार घेण्याचे फायदे

१. पैशांची बचत

जुनी कार खरेदी करण्याचा सर्वांत मोठा फायदा हाच आहे की नव्या कारच्या तुलनेत किंमत कमी असते. आता तर अनेक कंपन्यानी स्वतच जुन्या गाड्यांचे शोरूम सुरू केले आहे. नवी कार खरेदी केली की तीन वर्षांच्या आत तिची किंमत कमी झालेली असते ती रोकड मध्ये मोडायला लागते. जवळपास ६० टक्क्यांनी ही किंमत कमी झालेली असते.

२. इतर खर्च नाही

जुने वाहन खरेदी करताना कारच्या किमतीच्या व्यतिरिक्त कुठलाही अतिरिक्त खर्च नाही. नवी कार घेताना रजिस्ट्रेशन, रोड टैक्स, आरटीओशीसबंधित खर्च करावा लागतो. तर सेकेंड हँड गाडीचं आधीच रजिस्ट्रेशन झालेलं असतं. या कारचा इन्शूरन्स देखील असतो. आधीच्या मालकाने सर्व प्रकारचे कागदपत्र बनवून घेतलेले असतात. तुम्हाला फक्त ते कागदपत्र स्वतःच्या नावे करून घ्यायचे असतात. हे काम फार खर्चिक नसतं. त्यामुळे तुमचे बरेचसे पैसे वाचतील.

(हे ही वाचा : Second Hand Bike: अरे वा! फक्त १५ हजारात घरी आणा ‘ही’ १ लाखाची बाईक; मिळेल जबरदस्त मायलेज आणखी बरंच काही…)

३. फीचर्स असणार तुमच्या पसंतीचे
तुम्ही जुनी कार तुमच्या आवडीनुसार मॉडिफाय करू शकता. कारमध्ये तुमच्या आवडीचे जे फीचर्स नसतील ते तुम्ही आफ्टर मार्केट जोडू शकता. त्याऐवजी तुम्ही जर नवीन कार खरेदी करत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात बदल करू शकणार नाही.

४. कंपनीकडून मिळणार वॉरंटी
अनेक कंपन्यांनी जुन्या गाड्यांचे स्टोअर सुरू केल्यामुळे त्या स्वतच १ वर्षाची वारंटी देत आहेत. यात मारुती, ख़ुदाई, महिंद्रासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. शिवाय जुन्या गाड्या खरेदी करताना विम्याचे प्रिमीयमही कमी भरावे लागते. तसेच कर्ज कमी काढावे लागत असल्याने इन्स्टॉलमेंटही कमी पडते.

५. कमी बजेटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध
तुमचं बजेट ३.५ लाख ते ४ लाख रुपये असेल आणि तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या बजेटमध्ये वॅगनआरपासून ते मारुती बलेनो आणि विटारा ब्रेझापर्यंतची कोणतीही कार खरेदी करू शकता. या किंमतीत तुम्ही हॅचबॅक, एसयूव्ही, एमपीव्ही किंवा सेडान कार सहज खरेदी करू शकता.

Story img Loader