Komaki SE Series Electric Scooters Launched In India : इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे, त्यामुळे आता अनेक कंपन्या ग्राहकांची गरज पुरवण्यासाठी विविध व्हेरिएंट्समध्ये आपली ई वाहने लाँच करत आहेत. तर इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी कोमाकीने एसई सीरिज (Komaki SE series) अंतर्गत तीन स्कूटर लाँच केल्या आहेत. या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्स एसई प्रो (SE Pro), एसई अल्ट्रा (SE Ultra) आणि एसई मॅक्स (SE Max) अशा आहेत, ज्यांची किंमत ६७,९९९ रुपये ७६,९९९ रुपये आणि १,१०,००० रुपये (सर्व एक्स-शोरूम) आहेत; तर नवीन सीरिजच्या फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
नवीन कोमाकीने एसई प्रो (SE Pro), एसई अल्ट्रा आणि एसई मॅक्स हे एमजी प्रो मॉडेलवर बनवलेले आहेत. पण, ते अधिक स्पोर्टी दिसण्यासाठी रिव्हाइस्ज्ड स्टाइलिंगसह लाँच करण्यात आले आहेत. कोमाकी एसई प्रो मॉडेल २.७५ NAGR बॅटरीसह ११० ते १२० किमीची रेंज आणि कोमाकी एसई अल्ट्रा मॉडेल २.७ kw LiPo4 बॅटरीसह एम्बेड केलेले आहे, जे १३० ते १४० किमी रेंज देते, त्यानंतर ४.२ केडब्ल्यू LiPo4 सह कोमाकी एसई मॅक्स २०० प्लस किमीची रेंज प्रदान करते.
फीचर्स (Komaki SE series)
कोमाकी एसई मॅक्समध्ये ड्युअल चार्जर, टीएफटी स्क्रीन, ड्युअल डिस्क, ८० किमीचा टॉप स्पीड आहे. एसई रेंजमध्ये एसई प्रो आणि एसई अल्ट्रादेखील आहेत, जे सिंगल डिस्क, एलईडी डिजिटल स्पीडोमीटर आणि ७० किमी टॉप स्पीड देतात. इतर फीचर्समध्ये डिस्क ब्रेक, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, १२ इंच चाके आणि एलईडी लाइटिंग यांचा समावेश आहे.
याप्रसंगी बोलताना कोमाकी इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक गुंजन मल्होत्रा म्हणाले की, “कोमाकी इलेक्ट्रिकमध्ये आम्ही अत्यंत स्पर्धात्मक इलेक्ट्रिक वाहने आणण्यासाठी सतत नवनवीन उपक्रम राबवत आहोत. कोमाकी एसई सीरिज (Komaki SE series) लाँच करून आम्ही एकाच वाहनात वेग, सुरक्षितता आणि अपडेटेड फीचर्स देणारे संपूर्ण वाहन ग्राहकांसाठी घेऊन आलो आहोत.’