Komaki x one scooter : इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यामुळे आता अनेक कंपन्या ग्राहकांची गरज पुरवण्यासाठी विविध व्हेरिएंट्समध्ये आपली ई वाहने लाँच करत आहेत. ओला या क्षेत्रात आघाडीवर आहे. तिने ऑक्टोबर महिन्यात आपला सर्वात स्वस्त एस १ एअर ही स्कुटर लाँच केला. एलएमएलनेही आपला स्टार इलेक्ट्रिक स्कुटर ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. मात्र या दोन्ही स्कुटरची किंमत ८० हजारांच्या वर आहे. तुमचे बजेट ५० हजारांच्या आत असेल तर कोमाकीचा कोमाकी एक्स वन इलेक्ट्रिक स्कुटर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॅटरी, रेंज आणि गती

कोमाकीने या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये ६० वोल्ट, २० ते ३० एएच क्षमता असलेला लिथियम आयन बॅटरी पॅक दिला आहे. या बॅटरी पॅकला हब मोटर जोडण्यात आली आहे. नॉर्मल चार्जरने चार्ज केल्यास बॅटरी पॅक ६ ते ८ तासांत चार्ज होतो, असा दावा कंपनीने केला आहे. त्याचबरोबर, स्कुटर एकदा फूल चार्ज झाल्यानंतर ८५ किमीची रेंज देते, असा देखील कंपनीचा दावा आहे.

(‘या’ छोट्या इलेक्ट्रिक कारचे १६ नोव्हेंबरला भारतात पदार्पण, २०० किमी पर्यंत रेंज, किंमत ५ लाखांपेक्षाही कमी)

स्कुटरचे ब्रेकिंग आणि सस्पेन्शन

इलेक्ट्रिक स्कुटरला पुढे डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. यांच्यासह कॉम्बी ब्रेकिंग प्रणाली मिळते. स्कुटरच्या पुढील भागात टेलिस्कोपिक शॉक अब्झॉर्बर आणि मागे हायड्रॉलिक शॉक अब्झॉर्बर सस्पेन्शन प्रणाली देण्यात आली आहे.

फीचर आणि किंमत

स्कुटरमध्ये चार्जिंग पॉइंट, डीआरएलएस, क्लॉक, डिजिटल स्पिडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ओडोमीटर, सुरक्षेसाठी अँटि थेफ्ट अलार्म, पास स्विच, एलईडी हेडलँप, एलईडी टेल लँप, एलईडी टर्न सिग्नल लँप आणि लो बॅटरी इंडिकेटरसह अनेक फीचर्स मिळत आहेत. कोमाकीच्या Komaki X one स्कुटरची किंमत ४५ हजार रुपयांपासून सुरू होते. कमी बजट असलेल्यांसाठी हा स्कुटर चांगला पर्याय ठरू शकतो.