KTM 890 SMT India Launch Soon?: लोकप्रिय KTM ने पुन्हा एकदा मोठा धमाका केला आहे. KTM 890 SMT चे जागतिक लाँच करून कंपनीने दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा सुपर मोटो टूरर सेगमेंटमध्ये पुनरागमन केले आहे. यापूर्वी, कंपनीने २००९ मध्ये ९९० SMT लाँच केले होते परंतु नंतर ते २०२३ मध्ये बंद केले. ही एक अ‍ॅडव्हान्स टूरर बाईक आहे, जी केटीएमने पूर्णपणे नव्याने डिझाइन केलेली आहे. आता ही मोटरसायकल लवकरच भारतातही विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे. मात्र, कंपनीने अद्याप मोटरसायकलच्या किंमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

मोटारसायकलमध्ये हँडलबारचा विस्तार करण्यात आला आहे. यासोबतच त्याची सीटही खूपच आरामदायी करण्यात आली आहे आणि आकारही वाढवण्यात आला आहे. बाईकचे सस्पेन्शन पूर्णपणे बदलण्यात आले आहे. लांबच्या राइडसाठी १७ इंची अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा

री ट्यून इंज

KTM ला पूर्णपणे री-ट्यून केलेले ८९० LC8C इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन समांतर ट्विन मोडमध्ये आहे. हे ८००० rpm वर १०५ Bhp पॉवर आणि १०० Nm पीक टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह संलग्न आहे. यासोबतच KTM ने एअरबॉक्स देखील बदलला असून आता त्यात नवीन कॉम्पॅक्ट एअरबॉक्स देण्यात आला आहे.

(हे ही वाचा : Ola, Bajaj, Ather ची उडाली झोप, देशात येतेय एका चार्जमध्ये २३६ किमी पेक्षा जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत… )

मोटरसायकलला स्ट्रीट फोकस चेसिस, अॅडजस्टेबल सस्पेंशन तसेच ड्युअल डिस्क ब्रेक्स मिळतात. समोर WP Apex ४३ mm सस्पेंशन आणि मागील बाजूस WP अपेक्स मोनोशॉकआहे. मोटरसायकलचे वजन १९४ किलोग्रॅम असून तिचा ग्राउंड क्लीयरन्स २२७ मिमी आहे. मोटारसायकलमधील हाय-एंड स्टिअरिंग डँपर राईडला आरामदायी बनवत आहे.

वैशिष्ट्ये

केटीएम 890 एसएमटी फुल एलईडी लाईट्स, ब्लूटूथ कलर टीएफटी डिस्प्ले, रेन, स्ट्रीट आणि स्पोर्ट्सचे तीन राइडिंग मोड, ट्रॅक मोड कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल आणि सुपरमोटो मोड तसेच लीन सेन्सिटिव्ह एबीएस देण्यात आले आहेत. हीटेड ग्रिप, मोटर स्लिप रेग्युलेशन, क्विक शिफ्टर, क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्येही मोटरसायकलमध्ये पाहायला मिळतील.