तरुणाईमध्ये केटीएम बाईक वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच आता केटीएम इंडिया (KTM India) ने आपली नवीन अ‍ॅडव्हेंचर KTM 200 Duke ही बाईक नवीन फीचर्ससह भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये LED हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या २०० ड्यूक ही कंपनीची पहिली बाईक आहे. ही सर्वात जास्त विकली जाणारी KTM बाईक आहे. या बाईकमध्ये कोणकोणते नवीन फीचर्स देण्यात आले आहेत व याची किंमत किती असेल याबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

KTM 200 Duke मध्ये काय आहे नवीन ?

भारतीय बाजारपेठेमध्ये कंपनीने KTM २०० ड्यूक एका महत्वाच्या अपडेटसह लॉन्च केली आहे. याच्या हेडलाईटचा लुक खूपच आकर्षक असा तयार करण्यात आला आहे. हेडलॅम्प युनिटमध्ये बीमसाठी ६ रिफ्लेक्टर आणि ३२ LED देण्यात आले आहेत. केटीएमच्या नवीन ड्यूक बाईकमध्ये अतिरिक्त LED DRL युनिट जोडण्यात आले आहे.

हेही वाचा : VIDEO: KGF स्टार यशने खरेदी केली नवीन रेंज रोव्हर, किंमत वाचून व्हाल थक्क

KTM 200 Duke च्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये जुन्या मॉडेलप्रमाणेच सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन २४ बीएचपी पॉवर आणि १९.२ एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी हे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. KTM 390 Duke मॉडेलप्रमाणे या नवीन बाईकमध्ये क्विक शिफ्टर देण्यात आलेले नाही.

लेटेस्ट अ‍ॅडव्हेंचर बाईकच्या समोरील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक बघायला मिळतात. तसेच यामध्ये ड्युअल चॅनेल ABS, USF फॉर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक व ट्युबलेस टायरसह अलॉय व्हील्स पाहायला मिळतात. ग्राहक ही नवीन केटीएम बाईक इलेक्ट्रॉनिक ऑरेंज आणि डार्क सिल्व्हर मेटॅलिक या दोन रंगांमध्ये खरेदी करू शकतात.

केटीएम २०० ड्यूक बाईकच्या लॉन्चिंगवेळी बजाज ऑटो लि. चे अध्यक्ष (Probiking) सुमित नारंग म्हणाले, ”हे LED हेडलॅम्प KTM २०० ड्यूक बाईकला पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक आणि प्रीमियम बनवते. KTM 200 Duke पहिल्यांदा भारतात लॉन्च केल्यावर परफॉर्मन्स बाइकिंग सेगमेंटमध्ये सुरू झालेली क्रांती आम्ही या अपग्रेडसह कायम ठेवत आहोत. ”

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 20 June: ‘या’ शहरांमध्ये सर्वात महाग झालं पेट्रोल आणि डिझेल, पाहा तुमच्या शहरातील दर

काय असणार किंमत

केटीएम इंडिया (KTM India) ने आपली नवीन अ‍ॅडव्हेंचर KTM 200 Duke ही बाईक नवीन फीचर्ससह भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. ही बाईक कंपनीने १.९६ लाख (एक्स-शाेरूम) रूपयांमध्ये लाॅन्च केली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ktm india launch 2023 ktm duke 200 with led headlamps in 1 96 lakh rs check features and deatils tmb 01
Show comments