स्पीड आणि अॅडव्हेंचर बाईकसाठी ओळखल्या जाणाऱ्या KTM ने आपल्या 250 अॅडव्हेंचर बाईकची नवीन एडिशन लॉंच केली आहे. KTM ने या बाईकची एक्स-शोरूम किंमत २ लाख ३५ हजार रुपये ठेवली आहे आणि दोन नवीन रंगांमध्ये ही बाईक लॉंच करण्यात आलीय. देशभरातील सर्व डीलरशिपवर KTM 250 अॅडव्हेंचर बाईक्सची बुकिंग सुरू झाली आहे. KTM 250 अॅडव्हेंचर बाईकमध्ये आणखी काय काय फीचर्स उपलब्ध आहेत ते जाणून घ्या…
KTM 250 Adventure दोन नवीन रंगांमध्ये उपलब्ध
KTM ने इलेक्ट्रिक ऑरेंज आणि फॅक्टरी रेसिंग ब्लू रंगांमध्ये 250 अॅडव्हेंचर बाईक लॉंच केली आहे, यात नवीन पेंट ऑप्शनसह पुन्हा डिझाइन केलेले ग्राफिक्स देखील दिसतील. सोबतच बाईकच्या स्टाईल आणि बॉडीमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल केले गेले नाहीत, 250 अॅडव्हेंचर बाईकमध्ये फक्त दोन कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.
आणखी वाचा : ओकायाच्या नव्या ई-स्कूटरसाठी बुकिंग सुरू, 200km ची रेंज, 70kmph ची टॉप स्पीड आणि बरंच काही…
KTM 250 Adventure चे इंजिन
KTM च्या एंट्री-लेव्हल अॅडव्हेंचर बाईकमध्ये, कंपनीने 240cc लिक्विड-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे, जे 9000rpm वर 29.6bhp पॉवर आणि 7500rpm वर 24Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच या बाईकमध्ये सिक्स स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
आणखी वाचा : शानदार ऑफर! केवळ २१ हजारात घरी न्या Bajaj Discover 150 बाईक
KTM 250 Adventure चे सेफ्टी फीचर्स
KTM ने या बाईकमध्ये 200mm ग्राउंड क्लीयरन्स दिला आहे, ज्यामुळे ही बाईक माउंटन राईडमध्ये अतिशय आरामदायी ठरेल. समोर 320 मिमी सिंगल डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 230 मिमी डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. याशिवाय, या बाईकमध्ये ऑफ-रोड मोडसह ड्युअल चॅनल एबीएस देखील देण्यात आला आहे जो तात्पुरतं मागील चाकाचा एबीएस बंद करतो.
आणखी वाचा : Wow! फक्त ३० हजारात खरेदी करा Honda Activa, एक वर्षाची वॉरंटी, 60 kmpl ची मायलेज
KTM 250 Adventure चे स्पेसिफिकेशन्स
नवीन बाईकच्या डिझाईन आणि फिचर्सबद्दल सांगायचं झालं तर, ती पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे. ही बाईक 390 अॅडव्हेंचरपासून प्रेरित आहे. यात 14.5 लिटरची फ्यूल टॅंक, एडजस्टेबल विंडस्क्रीन, लार्ज कुशन सीट आणि एलईडी लाइटिंग मिळते. इन्स्ट्रुमेंट कन्सोलसाठी येथे TFT डिस्प्ले आहे. जर तुम्हाला ही बाईक EMI वर खरेदी करायची असेल तर कंपनी ही सुविधा देखील देत आहे. ज्यामध्ये KTM 250 अॅडव्हेंचर बाईक केवळ ६,३०० रुपयांच्या मासिक ईएमआयवर घरी आणता येणार आहे.