टू व्हीलर सेक्टरमधील बाईक सेगमेंटमध्ये स्पोर्ट्स बाईक सेगमेंट हा कमी बजेटच्या मायलेज देणार्या बाईक्सनंतर सर्वाधिक पसंतीचा सेगमेंट आहे, ज्यांना हाय स्पीडची आवड असलेल्या तरुणांमध्ये जास्त मागणी आहे. या सेगमेंटमध्ये असलेल्या स्पोर्ट्स बाईकच्या मोठ्या रेंजमध्ये, आज आम्ही KTM RC 125 बद्दल बोलत आहोत जी तिच्या स्टाईल आणि स्पीडमुळे पसंत केली जाते.
KTM RC 125 STD Price
KTM RC 125 ची सुरुवातीची किंमत १,८६,८६१ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी ऑन रोड असताना २,१०,३३३ रुपयांपर्यंत पर्यंत जाते. तुम्हाला ही बाईक विकत घ्यायची इच्छा असेल, पण एवढे मोठे बजेट तयार करू शकत नसाल, तर ती विकत घेण्यासाठी येथे सोपा फायनान्स प्लॅन जाणून घ्या.
आणखी वाचा : केवळ १५ हजारात मिळतेय Hero Super Splendor, जाणून घ्या ऑफर
KTM RC 125 STD Finance Plan
ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही स्पोर्ट्स बाईक फायनान्स प्लॅन अंतर्गत खरेदी केली तर बँक तुम्हाला यासाठी १,८९,३३३ रुपये कर्ज देईल.
हे कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला २१,००० रुपये किमान डाउन पेमेंट आणि त्यानंतर दरमहा ६,०८३ रूपये मासिक EMI जमा करावे लागेल.
आणखी वाचा : Kia Sonet X Line दोन व्हेरिएंटसह भारतात झाली लॉंच, जाणून घ्या SUV ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
KTM RC 125 वर दिल्या जाणाऱ्या या कर्जाची परतफेड करण्यासाठी, बँकेने ३ वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे आणि या काळात बँक दिलेल्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.७ टक्के दराने व्याज आकारेल.
फायनान्स प्लॅन अंतर्गत उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट आणि ईएमआय प्लॅनचे तपशील वाचल्यानंतर, तुम्हाला या बाइकचे इंजिन, स्पेसिफिकेशन आणि मायलेजचे संपूर्ण तपशील जाणून घेणे गरजेचे आहे. जाणून घ्या सविस्तर…
आणखी वाचा : Bike Mileage Increase Tips: बाईकच्या मायलेजची चिंता वाटतेय? मग या ५ टिप्स समस्या दूर करतील
बाईकच्या इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने १२४.७ सीसी सिंगल सिलिंडर असलेले सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन १४.९५ PS ची पॉवर आणि १२ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही KTM RC 125 स्पोर्ट्स बाईक ४६ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.