महिंद्रा ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. महिंद्रा कंपनीकडे डिझेल एसयूव्ही प्रमाणेच पेट्रोल एसयूव्ही देखील उपलब्ध आहेत. आज आपण टॉप ५ पेट्रोल एसयूव्ही बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांची मे २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे.

मे २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप ५ महिंद्रा कंपनीच्या टॉप पेट्रोल एसयूव्ही बद्दल माहिती पाहणार आहोत. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Daily petrol diesel price on 23 December
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात ‘इतक्या’ रुपयांनी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर! पाहा तुमच्या शहरांत काय सुरु आहे इंधनाची किंमत
Toyota revealed Urban Cruiser EV as Sister Model of Suzuki e Vitara
Urban Cruiser EV : टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक कार! सुझुकी ई विटाराची जणू धाकटी बहीण; पाहा, भारतात कधी होणार लाँच?
Chetak Festival, Horse Sarangkheda Chetak Festival,
अबब…सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये १९ कोटींचा घोडा
gas pipeline burst in thane
ठाण्यात पाचशे घरांचा गॅस पुरवठा तीन तासंपासून ठप्प, जलवाहिनीच्या खोडकामादरम्यान गॅस वहिनी तुटली
nmmt bus tracking system technical glitch
नवी मुंबई : ट्रॅकिंग प्रणालीचे आधुनिकीकरण गरजेचे
Triumph Speed ​​T4
Triumph Speed T4: ट्रायम्फची शक्तीशाली बाईक एवढ्या रुपयांनी झाली स्वस्त, स्टॉक संपण्याआधी ऑफरचा घ्या लाभ

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 14 June: पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, पाहा तुमच्या शहरातील आजच्या किमती

महिंद्रा KUV100

महिंद्राच्या टॉप ५ पेट्रोल एसयूव्हीमध्ये पाचव्या नंबरवर आहे ती म्हणजे KUV100. मे २०२३ महिन्यात कंपनी याच्या एकही युनिट्सची विक्री करु शकली नाही. ही एसयूव्ही इतर बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाते. कंपनीने मागच्या महिन्यात २०२ युनिटसची निर्यात केली होती. महत्वाची बाब म्हणजे मे २०२२ मध्ये देखील कंपनी याच्या एकाही युनिट्सची विक्री करू शकली नाही.

Mahindra petrol vehicles in May 2023
सर्वाधिक विक्री झालेल्या महिंद्राच्या ५ पेट्रोल SUV (Image Credit-Financial Express)

महिंद्रा Scorpio

महिंद्रा स्कॉर्पिओ हे बोलेरो व्यतिरिक्त महिंद्रा कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. कंपनीने मे २०२३ मध्ये स्कॉर्पिओच्या पेट्रोल व्हेरिएंटच्या ७९० युनिट्सची विक्री केली आहे. स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पिओ एन अशा दोन पर्यायांमध्ये कंपनी या एसयूव्हीची विक्री करते.

महिंद्रा Thar

महिंद्राच्या टॉप ५ पेट्रोल एसयूव्हीच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे महिंद्रा थार. महिंद्रा कंपनीने मे २०२३ मध्ये थारच्या १,१०६ युनिट्सची विक्री केली आहे. थार एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंटमध्ये येते. मागच्या वर्षी मे २०२३ मध्ये कंपनीने या एसयूव्हीच्या ८०३ युनिट्सची विक्री केली होती. थारच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये मागच्या महिन्याच्या विक्रीमध्ये ३७.७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

हेही वाचा : Two-Wheeler Sales May 2023: मे महिन्यात दुचाकींच्या विक्रीत विक्रमी वाढ; ‘ही’ कंपनी आहे पहिल्या क्रमांकावर, जाणून घ्या

महिंद्रा XUV700

महिंद्रा XUV700 या एसयूव्हीची मे २०२३ मध्ये १,५०६ युनिट्सची विक्री झाली आहे. त्यामुळे टॉप ५ मध्ये ही एसयूव्ही दुसऱ्या स्थानावर आहे. मे २०२२ मध्ये याच्या ८८७ युनिट्सची विक्री झाली होती. ज्यात यंदाच्या मे महिन्यात ६९७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही एसयूव्ही देखील पेट्रोल व डिझेल या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

महिंद्रा XUV300

Mahindra XUV300ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी पेट्रोल एसयूव्ही आहे. जी कंपनीने काही कालावधी आधीच अनेक नवीन अपडेटसह लॉन्च केली आहे. या एसयूव्हीने मे २०२३ मध्ये २,१४९ युनिट्सची विक्री केली आहे. तर मे २०२२ मध्ये याची विक्रीची संख्या २,३९७ इतकी होती. यंदा विक्रीमध्ये १०.३ टक्क्यांची घट झाल्यानंतरही ही एसयूव्ही सर्वाधिक विक्री होणार ठरली आहे.

Story img Loader