लॅम्बोर्गिनी हुराकन्स गाड्या परत मागवल्याने कारप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. चार हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या परत मागवण्याची कंपनीची पहिलीच वेळ आहे. मात्र आता त्याचं नेमकं कारण समोर आलं आहे. गेल्या वर्षी लॅम्बोर्गिनीने ४,७९६ हुराकन्स गाड्या हेडलाइट ऍडजस्टमेंट स्क्रूवर कॅप न ठेवता वितरित केल्या होत्या. नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनने (NHTSA)नुकत्याच केलेल्या घोषणेमध्ये सांगितलं आहे की, या सर्व गाड्या कॅप बसवण्यासाठी परत मागवण्याच्या अधीन आहेत. दुसरीकडे, कंपनी या मॉडेल्सच्या मालकांना नविन पार्ट मोफत बसवून देणार आहे.

२०२० या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या नियमित अंतर्गत ऑडिटमध्ये ही बाब समोर आली होती. तेव्हा ही एक मानवी चूक असल्याचं कारण पुढे आलं होतं. लॅम्बोर्गिनीने अधिकृतपणे हेडलाइटच्या क्षैतिज समायोजन स्क्रूवर ब्लँकिंग कॅप्स नसल्याची पुष्टी केली. त्याचबरोबर फेडरल सेफ्टी स्टँडर्डचे पालन करत नाही. कंपनीने मार्च २०२० मध्ये या समस्येबाबत एजन्सीला सूचित केले आणि त्यानंतर याचिका सादर केली. मात्र नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनने याचिका फेटाळून लावल्याने कंपनीने ब्लँकिंग कॅप्सशिवाय असलेली मॉडेल्स परत मागवली होती. एजन्सीने या एका चुकीमुळे वाहनचालकासाठी सम्स्या निर्माण होऊ शकतो असं सांगितलं होतं. दृश्यमानतेच्या समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे गंभीर अपघात देखील होऊ शकतात.

Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
China Accident
China Accident : धक्कादायक! भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३५ जणांचा मृत्यू, ४३ जण जखमी, दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
army recruitment, Deolali camp, nashik district
सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत

मालवाहू जहाजाला आग लागल्याने Porsche, Audi सह चार हजार लक्झरी गाड्यांचं नुकसान!

दुसरीकडे, भविष्यातील लॅम्बोर्गिनी हुराकन स्पोर्ट्सकार या ब्रँडमध्ये एक विशेष नेव्हिगेशन प्रणाली असेल जी what3words द्वारे विकसित केली जाईल. ही सेवा २०२२ च्या मध्यापासून मॉडेल्समध्ये उपलब्ध होईल.