भारतात लक्झरी कारची क्रेझ हळूहळू वाढत आहे. जगभरातून दरवर्षी हजारो लक्झरी कार इथे आयात केल्या जातात. लॅम्बोर्गिनी इंडियाने २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये ८६ टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. इटालियन सुपरकार कंपनीने ६९ कार वितरित केल्या आहेत, असा दावा लॅम्बोर्गिनी इंडियाचे प्रमुख शरद अग्रवाल यांनी लिंक्डइनवरील पोस्टमध्ये केला आहे. २०२१ मध्ये लॅम्बोर्गिनीने भारतीय बाजारपेठेत ह्यूराकन ईओ आरडब्ल्यू स्पायडर, यूरस पर्ल कॅप्सूल, यूरस ग्रॅफाइट कॅप्सूल आणि ह्यूरान एसटीओ ही चार नवीन उत्पादने लाँच केली आहेत.
शरद अग्रवाल यांनी सांगितले की,,”लॅम्बोर्गिनी इंडियाने २०२१ मध्ये नवीन उत्पादने लाँच केल्यामुळे ग्राहकांचा कल वाढला आणि मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. कंपनी २०२२ मध्येही ही गती कायम ठेवण्यास सक्षम असेल.”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशात १०० वी यूरस गाडी वितरीत करून सुपर-लक्झरी कार विभागातील १०० वेगवान कारचा टप्पा गाठला, असंही त्यांनी पुढे सांगितले.
Bajaj Platina 100 vs Hero HF Deluxe: किंमत, फिचर्स आणि मायलेजबाबत माहिती जाणून घ्या
ऑटोमेकरचा असाही दावा आहे की, “गेल्या वर्षी दोन टप्पे गाठले होते, ज्यामुळे अधिक ग्राहकांना गुंतवून ठेवण्यात आणि अधिक लक्ष वेधून घेण्यात मदत झाली. दिल्ली – चंदीगड – शिमला येथून Esperienza GIRO दरम्यान ५५० किमीच्या ड्राईव्हमध्ये ५० लॅम्बोर्गिनी मॉडेल्सचा सहभाग होता. २०२१ दरम्यान ५० लॅम्बोर्गिनींनी तीन टप्प्यात १५०० किमी किमी अंतर चालवल्याचा दावा केला. या दरम्यान कार घेऊन उमलिंग ला पासला पोहोचले, जो कोणत्याही लॅम्बोर्गिनी कारने पोहोचलेला सर्वात उंच रस्ता आहे.