Land Rover Defender Octa SUV Launched: जग्वार लँड रोव्हरने देशात नवीन डिफेंडर ऑक्टा एसयूव्ही अधिकृतपणे लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि शक्तिशाली इंजिनने सुसज्ज असलेल्या या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत २.५९ कोटी रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, ग्राहक डिफेंडर ऑक्टा एडिशन वन देखील खरेदी करू शकतात, जी केवळ उत्पादनाच्या पहिल्या वर्षासाठी उपलब्ध असेल आणि त्याची किंमत २.७९ कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे.
डिफेंडर फॅमिलीमध्ये ऑक्टा व्हेरिएंट सगळ्यात टॉपला आहे. ही एसयूव्ही तिच्या पॉवर आणि परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. पाच-दरवाज्यांच्या ‘११०’ बॉडी स्टाइलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्टाचे बुकिंग गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झाले. आता ती अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच करण्यात आली आहे. खरंतर, पहिल्या बॅचचे सर्व युनिट्स विकले गेले आहेत. म्हणजे पहिली बॅच सोल्ड-आउट आहे. आता ज्यांनी ही गाडी बुक केले आहे त्यांना डिलिव्हरीची वाट पहावी लागेल.
लूक आणि डिझाइन…
या २.५ टन वजनाच्या एसयूव्हीच्या एक्सटिरियरमध्ये चांगले अप्रोच आणि डिपार्चर अँगल, उंच राईड हाईट, रुंद स्टॅन्स, एक्सटेंडेड व्हील आर्च, नवीन ग्रिल, क्वाड टिप एक्झॉस्ट आहे. कंपनीने ही एसयूव्ही २० ते २२ इंचांच्या व्हील साईजमध्ये सादर केली आहे, जी तिची साइड प्रोफाइल सुधारण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, सिग्नेचर ग्राफिक पॅनेलमध्ये मशीन केलेल्या आणि सँडब्लास्ट केलेल्या टायटॅनियम डिस्कमध्ये चमकदार काळ्या हिऱ्यासह एक घेरलेला डायमंड ग्राफिक आहे.
कलर ऑप्शन्स
डिफेंडर ऑक्टा दोन खास कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आली आहे. जे मेटॅलिक फिनिशने सजवलेले आहे. कलर पॅलेटमध्ये पेट्रा कॉपर आणि फॅरो ग्रीन, कार्पेथियन ग्रे आणि चारेंटे ग्रे तसेच ग्लॉस नार्विक ब्लॅकमध्ये कॉन्ट्रास्ट रूफ आणि टेलगेटचा समावेश आहे.
पॉवर आणि परफॉर्मन्स…
नवीन डिफेंडर ऑक्टा ४.४-लिटर ट्विन-टर्बो माइल्ड-हायब्रिड V8 इंजिनद्वारे समर्थित आहे जे ६२० बीएचपी पॉवर आणि ८०० एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की ही एसयूव्ही फक्त ४ सेकंदात १०० किमी प्रतितास वेग गाठू शकते.
१ मीटर खोल पाण्यात धावेल एसयूव्ही…
याशिवाय, यात 6D डायनॅमिक सस्पेंशन, मोठ्या प्रमाणात रिवर्क केलेले चेसिस आणि सस्पेंशन कंपोनन्ट देण्यात आले आहेत. विशेषतः एसयूव्हीसाठी विकसित केलेल्या सर्वात मोठ्या टायर्सनी सुसज्ज असल्याचा दावा या कारसाठी केला जातो. नियमित डिफेंडरच्या तुलनेत, ऑक्टा ६८ मिमी रुंद आणि २८ मिमी उंच आहे. याची वॉटर वेंडिंग क्षमता १ मीटर आहे. याचा अर्थ असा की आतापर्यंत सादर केलेल्या इतर कोणत्याही डिफेंडरपेक्षा ती पाण्याखाली १०० मिमी खोलवर जाऊ शकते.याचा ग्राउंड क्लीयरन्स ३२३ मिमी आहे.
फीचर्स
कंपनीने डिफेंडर ऑक्टामध्ये काही मेकॅनिकल अपडेट्स दिले आहेत. यात ६डी डायनॅमिक सस्पेंशन आहे जे सतत व्हेरिएबल सेमी-अॅक्टिव्ह डॅम्पर्स सक्रिय करून पिच आणि बॉडी रोल होण्याची शक्यता कमी करते. त्यात उत्कृष्ट ऑफ-रोड सेटिंग्ज देखील आहेत. इतर अपडेट्समध्ये ब्रेम्बो कॅलिपर्ससह ४०० मिमी डिस्क ब्रेकचा समावेश आहे. कंपनीने तिचा ग्राउंड क्लिअरन्स २८ मिमीने वाढवला आहे. यात ऑफ रोडिंगसाठी ऑक्टा-ड्राइव्ह मोड देखील आहे.