२०२३-२४ या आर्थिक वर्षात मारुती सुझुकीची वॅगनआर सर्वाधिक विकली जाणारी कार होती. तिने सलग तिसऱ्या वर्षी भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा वर्चस्व कायम ठेवला तर टाटा नेक्सॉन ही सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक विक्री होणारी SUV म्हणून उदयास आली. FY24 मध्ये देशांतर्गत बाजारात विकल्या गेलेल्या ५० टक्के पेक्षा जास्त कारमध्ये SUV सेगमेंटचे योगदान होते, या कालावधीत भारतातील दहा सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये पाच SUV मॉडेल आहेत. याशिवाय तीन हॅचबॅक कार आणि सेडान आणि एमपीव्ही सेगमेंटमधील प्रत्येकी एक कारही होती.
मार्केट शेअर बद्दल बोलायचे तर, FY२४ मध्ये पॅसेंजर व्हेईकल (PV) उद्योगात, SUV सेगमेंटचा वाटा ५०.४ टक्के, हॅचबॅक २७.८ टक्के, MPV ९.३ टक्के, सेडान ९ टक्के आणि व्हॅन सेगमेंट ३.५ टक्के होता. गेल्या आर्थिक वर्षातील आकडेवारी पाहिल्यास, SUV, MPV आणि व्हॅन सेगमेंटचा बाजार हिस्सा वाढला आहे तर हॅचबॅक आणि सेडान विभागांचा बाजार हिस्सा घसरला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या दहा कारपैकी सहा मॉडेल मारुती सुझुकी इंडियाच्या होत्या. त्याचबरोबर भारतीय कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या दोन गाड्या या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या. गेल्या आर्थिक वर्षातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीवर एक नजर टाकूया..
(हे ही वाचा : एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम )
FY24 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार
मारुती सुझुकी वॅगनआर
मारुती सुझुकी वॅगनआरने आर्थिक वर्ष २४ मध्ये एकट्या भारतात २००,१७७ युनिट्सच्या विक्रीसह कार बाजारावर वर्चस्व कायम राखले. कंपनीची ही कार २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षातही भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार होती.
मारुती सुझुकी बलेनो
मारुती सुझुकीच्या बलेनो मॉडेलला FY२४ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत दुसरे स्थान मिळाले. या कालावधीत कंपनीने १९५,६०७ युनिट्सची विक्री केली.
मारुती सुझुकी स्विफ्ट
मारुती सुझुकीच्या बलेनो मॉडेलला FY२४ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत दुसरे स्थान मिळाले. या कालावधीत कंपनीने १९५,६०७ गाड्या विकल्या.
यानंतर मारुती सुझुकी स्विफ्ट या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली. कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्ये १९५,३२१ स्विफ्ट कार विकल्या. WagonR, Baleno आणि Swift च्या विक्रीच्या आकड्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की मारुती सुझुकी इंडियाची ही वाहने भारतीय बाजारपेठेत हॅचबॅक सेगमेंटवर वर्चस्व गाजवत आहेत.
टाटा नेक्सॉन
Tata Nexon ने SUV सेगमेंटवर आपली पकड कायम ठेवली आणि FY २०२४ मध्ये १७१,६९७ युनिट्सच्या विक्रीसह SUV विभागातील नंबर एक मॉडेल म्हणून उदयास आले. तसेच ती FY२२ आणि FY२३ मध्ये भारतात सर्वाधिक विकली जाणारी SUV होती.
टाटा पंच
टाटा पंचने १७०,०७६ युनिट्सच्या विक्रीसह आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवली.
मारुती सुझुकी ब्रेझा
यानंतर टाटा नेक्सॉनला टक्कर देणारी मारुती सुझुकी ब्रेझा १६९,८९७ युनिट्सच्या विक्रीसह सहाव्या स्थानावर आहे.
मारुती सुझुकी डिझायर
सेडान सेगमेंटचे प्रतिनिधित्व मारुती सुझुकी डिझायरने केले होते. मारुतीने FY२४ मध्ये एकूण १६४,५१७ Dezire कार विकल्या.
ह्युंदाई क्रेटा
Hyundai Creta FY24 मध्ये १६१,६५३ युनिट्सच्या विक्रीसह भारतात सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची SUV म्हणून उदयास आली.
मारुती सुझुकी एर्टिगा
मारुती सुझुकी एर्टिगा या यादीत नववे स्थान मिळवणारी एकमेव MPV होती, ज्याने या कालावधीत १४९,७५७ युनिट्सची विक्री केली.
महिंद्रा स्कॉर्पिओ
महिंद्रा स्कॉर्पिओ FY२४ मध्ये १४१,४६२ युनिट्सच्या विक्रीसह दहाव्या स्थानावर आहे.