Beginner Bike Riding: देशभरात इतर वाहनांच्या तुलनेत दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. हे अपघात होण्यामागे बऱ्याचदा वाहनचालकाने गाडी चालवताना सुरक्षेचे नियम न पाळल्याने होतात. त्यामुळे तुम्हीदेखील जर पहिल्यांदाच बाईक किंवा स्कुटी चालवायला शिकत असाल, तर तुमच्यासाठी या नियमांचे पालन करणे अधिक महत्त्वाचे आहे.

नवीन वाहनचालकांसाठी महत्त्वाच्या टिप्स

चांगल्या दर्जाचे हेल्मेट घाला

प्रत्येक दुचाकीचालकासाठी बाईक चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. तुम्ही बाईक चालवायला शिकत असाल तर तुम्हाला हेल्मेट घालणे आवश्यक आहे. हे केवळ तुमचे संरक्षण करत नाही, तर यामुळे तुमच्याकडून दंड घेतला जात नाही. त्यामुळे नेहमी चांगल्या कंपनीचे आणि चांगल्या दर्जाचे हेल्मेट घ्या. हेल्मेट खरेदी करताना ते ISI मार्क आहे का याची खात्री करा. यासोबतच तुम्ही खरेदी करत असलेले हेल्मेट तुमच्या डोक्याला नीट बसत आहे की नाही हे तपासून पाहा.

दोन्ही ब्रेक वापरायला शिका

बाईक किंवा स्कुटी कशी चालवायची हे शिकण्याआधी त्याचे दोन्ही ब्रेक नीट वापरायला शिकले पाहिजे. तुमच्या सुरक्षिततेसाठी ब्रेकचा योग्य वापर करायला शिकणंही खूप महत्त्वाचं आहे.

जास्त वेगाने दुचाकी चालवू नका

दुचाकी शिकणाऱ्या चालकांनी त्यांच्या वाहनाचा वेग नेहमी कमी ठेवायला हवा. जर तुम्ही जास्त वेगाने गाडी चालवली आणि योग्य वेळी त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही तर तुमचा अपघात होऊ शकतो.

तुमच्या लेनमध्ये गाडी चालवा

दुचाकी असो किंवा इतर कुठलीही गाडी, ती नेहमी तुमच्या लेनमध्ये चालवावी. जर तुम्हाला रस्त्यावर कुठेतरी वळावे किंवा थांबावे लागले तर तुम्ही त्याबद्दल साइड इंडिकेटरद्वारे कळवा. अशावेळी लेन अचानक बदलू नका, कारण बऱ्याचदा अचानक लेन बदलल्यामुळे अपघात होतात.

समोरच्या वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवा

दुचाकी चालवताना नेहमी पुढे किंवा दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या वाहनांपासून योग्य अंतर ठेवा. जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलात, तर अशावेळी कोणत्याही वाहनाच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका.

हेही वाचा: पावसाळ्यात कारची चमक आणि रंगाची घ्या विशेष काळजी; फॉलो करा ‘या’ टिप्स

ओव्हरटेकिंग टाळा

बाईक चालवायला शिकत असताना समोर धावणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करणे टाळा. अनेकांना दुसऱ्या वाहनांना ओव्हरटेक करायला खूप आवडते. पण, यामुळे अनेकदा अपघातदेखील होतात.

सेफ्टी गियर घाला

बाईक चालवण्यापूर्वी तुम्ही रायडिंग गियर वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे रायडिंग गिअर्स अपघातादरम्यान तुम्हाला सुरक्षित ठेवतात. हे नी-कॅप गार्ड, चेस्ट गार्ड, हार्ड शेल हेल्मेट, हातमोजे आणि शूजसह येते; जे तुम्हाला दुखापत होण्यापासून वाचवतील.