Car With 10 Airbags: देशात अनेक लोक कोणतीही कार घेताना त्याचा लूक पाहतात. मात्र, जितका आपण कारचा लूक पाहतो तितकेच त्या कारचे सेफ्टी फीचर्सही पाहायला हवे. कारण कार चालवत असताना अपघात झाल्यास चांगले सेफ्टी फीचर्स कारमध्ये असल्यास तुमचा जीव वाचू शकतो. म्हणून कारचे सेफ्टी फीचर्स पाहणे खूप महत्वाचे असते. सध्या भारतातील सर्व कारमध्ये दोन एअरबॅग देणे बंधनकारक आहे. एवढेच नाही तर भारत सरकार लवकरच सर्व कारसाठी ६ एअरबॅग अनिवार्य करू शकते. त्यामुळे कारमधील प्रवाशांची सुरक्षा वाढण्यास मदत होणार आहे.
तथापि, काही कार उत्पादक स्वत: कारची सुरक्षा खूप गांभीर्याने घेतात. लग्जरी कार उत्पादक कंपनी लेक्सस इंडिया अशा कार उत्पादकांपैकी एक आहे. Lexus ने आपल्या ES300h लक्झरी सेडानमध्ये १, २ किंवा ६ नव्हे तर १० एअरबॅग दिल्या आहेत. याशिवाय इतरही अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
यात दोन फ्रंट एअरबॅग्ज (ड्रायव्हर आणि पॅसेंजरसाठी), दोन गुडघ्याच्या एअरबॅग्ज (ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी), दोन फ्रंट साइड एअरबॅग्ज (दोन्ही बाजू), दोन मागील बाजूच्या एअरबॅग्ज (दोन्ही बाजू) आणि दोन पडदे शील्ड एअरबॅग्ज आहेत. अशा प्रकारे सर्व १० एअरबॅग्ज ठेवण्यात आल्या आहेत.
(हे ही वाचा: Royal Enfield, Honda चे धाबे दणाणले, बजाज देशात करणार मोठा धमाका! आणतेय दोन नव्या बाईक, किंमत… )
किंमत
Lexus ES300h ची किंमत ६२ लाख ते ६८.४५ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. हे एक्सक्झिट आणि लक्झरी या दोन प्रकारांमध्ये येते.
इतर सुरक्षितता वैशिष्ट्ये
– एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) ईबीडी (इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन) सह
– वाहन स्टेबिलिटी कंट्रोल
– हिल स्टार्ट असिस्ट
– ऑटो लोकेशनसह टायर इन्फ्लेशन प्रेशर वार्निंग
– सायरन, इंट्रूजन (ब्रेक-इन) सेन्सर आणि टिल्ट सेन्सरसह अँटी थेफ्ट सिस्टम
-इम्पैक्ट सेंसिंग फ्यूल कट (इलेक्ट्रिक)
-स्पीड लॉक फंक्शनसह पॉवर डोअरलॉक
-जाम प्रोटेक्शन आणि स्पीड कंट्रोलसह पॉवर विंडो
आपत्कालीन ब्रेक सिग्नल