रॉयल एनफिल्ड म्हटलं की तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. रॉयल एनफिल्ड चालवण्यासाठी उत्सुकता कायम असते. कंपनीनं नुकतीच १२० वर्षे पूर्ण केली आहेत. या वर्षाचं औचित्य साधत कंपनीने लोकप्रिय 650 ट्विन मोटरसायकल्स – इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल GT 650 ची १२० व्या वर्धापनदिनी मॉडेल सादर केलं आहे. बाइक्स EICMA 2021 (मिलान मोटरसायकल शो) मध्ये सादर करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या लिमिटेड एडिशन बाईकच्या फक्त ४८० युनिट्स असतील. या मोटारसायकल भारत, युरोप, अमेरिका आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये विकल्या जाणार आहेत. भारतात दोन्ही मोटारसायकलचे एकूण १२० युनिट्स खरेदी करता येतील. भारतात ६ डिसेंबर २०२१ रोजी कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध असतील. केवळ मर्यादित काळासाठी ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असतील. या मोटारसायकल खरेदी करू इच्छिणारे ग्राहक २४ नोव्हेंबरपासून वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात. विक्री प्रक्रियेचे तपशील थेट नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर शेअर केले जातील.

मॉडेल खास बनवण्यासाठी यूके आणि भारतीय टीमने डिझाइन आणि हँडक्राफ्ट केलं आहे. मोटारसायकल यूनिक असून रिच ब्लॅक क्रोम टँक आहे. ही टाकी चेन्नईतील रॉयल इनफिल्डच्या उत्पादन प्रकल्पात विकसित करण्यात आली आहे. पहिल्यांदाच मोटारसायकलचे भाग पूर्णपणे काळे करण्यात आले आहेत. इंजिन, सायलेन्सर आणि इतर घटक काळ्या रंगात रंगवले आहेत.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Sunil Pal reveals kidnapping details
Comedian Sunil Pal: बेरोजगारांनी केलं कॉमेडियन सुनील पाल यांचं अपहरण; खंडणीच्या पैशांतून सोनं घेतलं, २० हजार देऊन पाल यांना सोडलं
British Indians stripped of honours by the UK Crown
हिंदूंची बाजू घेतल्याने अन् मोदींचे समर्थन केल्याने किंग चार्ल्स यांनी दोन ब्रिटीश भारतीयांना दिलेला सन्मान परत घेतला; प्रकरण काय?

मोटारसायकलमध्ये फ्लायस्क्रीन, इंजिन गार्ड, हील गार्ड, टूरिंग आणि बार अँड मिरर यांसारख्या अ‍ॅक्सेसरीज आहेत. यात हँडक्राफ्टेड टँक बॅजिंग देखील मिळते. प्रत्येक मोटरसायकल खास बनवण्यासाठी, टँक टॉप बॅजमध्ये मोटरसायकलचा युनिक नंबर देखील असेल. रॉयल इनफील्ड 650 ट्विन लिमिटेड एडिशनच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्यात कोणताही बदल केलेला नाही. यात पूर्वीसारखेच ६४८ सीसी पॅरलल-ट्विन इंजिन मिळेल, जे ४७ बीपीएच आणि ५२ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात ६-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Story img Loader