रॉयल एनफिल्ड म्हटलं की तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. रॉयल एनफिल्ड चालवण्यासाठी उत्सुकता कायम असते. कंपनीनं नुकतीच १२० वर्षे पूर्ण केली आहेत. या वर्षाचं औचित्य साधत कंपनीने लोकप्रिय 650 ट्विन मोटरसायकल्स – इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल GT 650 ची १२० व्या वर्धापनदिनी मॉडेल सादर केलं आहे. बाइक्स EICMA 2021 (मिलान मोटरसायकल शो) मध्ये सादर करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या लिमिटेड एडिशन बाईकच्या फक्त ४८० युनिट्स असतील. या मोटारसायकल भारत, युरोप, अमेरिका आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये विकल्या जाणार आहेत. भारतात दोन्ही मोटारसायकलचे एकूण १२० युनिट्स खरेदी करता येतील. भारतात ६ डिसेंबर २०२१ रोजी कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध असतील. केवळ मर्यादित काळासाठी ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असतील. या मोटारसायकल खरेदी करू इच्छिणारे ग्राहक २४ नोव्हेंबरपासून वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात. विक्री प्रक्रियेचे तपशील थेट नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर शेअर केले जातील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा