देशात दुचाकी चालकांची संख्या अगणित आहे. कमी इंधनात अधिक मायलेज देणारी, छोट्या रसत्यांतून फर्रकन निघत असल्याने दुचाकीला अधिक पसंत केले जाते. आता बाईक निर्मात्या कंपन्या दुचाकीमध्ये अधिक फीचर घेऊन येत आहेत. तसेच अधिक शक्तिशाली इंजनसह बाईक भारतीय बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे बाईक चाहत्यांना भरपूर पर्याय आहेत. दरम्यान ज्यांचे बजेट २ लाख ५० हजार आहे आणि त्यांना २५० सीसी बाईक हवी आहे, अशांसाठी बाजारात काही पर्याय उपलब्ध आहेत. चला तर मग या बाईक्सबाबत जाणून घेऊया.

१) केटीएम २५० अडव्हेंचर

Undisciplined drivers fined Rs 18 lakh 90 thousand Traffic Department takes action
बेशिस्त वाहनचालकांना १८ लाख ९० हजार रुपयांचा दंड; वाहतूक विभागाची कारवाई
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Budget 2025
Budget 2025 : तुमचा वार्षिक पगार १२ लाखांपेक्षा जास्त असेल तर काय होणार? समजून घ्या सोपं गणित
Budget 2025 Prices of Electric vehicles to get cheaper
Budget 2025 : इलेक्ट्रिक वाहनांबाबत निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा! अर्थसंकल्पातील निर्णयामुळे सर्वसामान्यांना मिळणार ‘हे’ फायदे
Cancer Radiation Chemotherapy Cancer Free Life Vandana Atre
कर्करोगाला रामराम ठोकताना…
News About Honda
Honda : होंडा भारतात सुरु करणार इलेक्ट्रिक बाइकची फॅक्टरी, काय असणार खासियत?
AICTE Scholarship for Engineering Students
अरे वाह! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५० हजार; काय आहे योजना?
rto measures for safe travel on the Mumbai-Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी उपायांची जंत्री

KTM 250 Adventure ही कंपनीची सर्वात छोटी अडव्हेंचर बाईक आहे. छोटी जरी असली तरी तिचे इंजन दमदार आहे. बाईमध्ये २५० सीसीचे इंजन आहे आणि ऑफरोड एबीएस फीचर आहे. बाईकमध्ये स्लिपर क्लच सारखे चांगले फीचर आहेत. ग्राहकांना यात एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि उंच विंडशिल्ड मिळते. या दुचाकीची एक्स शोरूम किंमत २.४४ लाख रुपयांपासून सुरू होते.

२) हुस्कवर्णा विट्पिलेन २५०

husqvarna vitpilen 250 ही एक नेकेड स्पोर्ट बाईक आहे. बाईकची कामगिरी जबरदस्त आहे. ही बाईक हल्की असून तिला आकर्षक असा राइडिंग पोस्चर आहे. बाइकमध्ये एबीएस आणि एलईडी लाइटिंग सारखे फीचर मिळतात. या बाईकची किंमत २.१४ लाख रुपयांपासून सुरू होते.

३) सुझुकी व्ही स्टॉर्म एसएक्स

Suzuki V-Strom SX सुझुकी व्ही स्टॉर्म एसएक्स एक स्पोर्ट अडव्हेंचर टूरर बाइक आहे. ही बाइक बनवाताना ग्राहकांच्या कंफर्टचा विचार करण्यात आला आहे. लांब प्रवास चांगला व्हावा यासाठी बाईमध्ये लांब ट्रॅव्हल सस्पेंशन आणि अपराइट हँडलबार देण्यात आला आहे. बाईमध्ये एलईडी हेडलँप आणि टेल लँप, स्लिप सीट, ड्युअल चॅनल एबीएस देण्यात आला आहे. बाहईकची सुरुवातीच किंमत २.११ लाख रुपये इतकी आहे.

४) बजाज डॉमिनॉर २५०

Bajaj dominar 250 एक कम्युटर बाईक आहे जी लांब प्रवासात चांगला परफॉर्मेन्स देते. ही दैनंदिन प्रवासासाठीही चांगला पर्याय आहे. बाईकमध्ये एबीएस, एलसीडी इन्स्ट्रुमेंटल कंसोल, एएचओ सारखे फीचर आहेत. या बाईकची सुरुवातीची (एक्स शोरूम) किंमत १.७५ लाख इतकी आहे.

५) यामाहा एफ झेड २५

Yamaha FZ25 ही एक स्ट्रिट बाईक असून ती २५० सीसी च्या इंजनसह येते. आपल्या सेगमेंटमध्ये ही एक चांगली आणि परवडेल अशी बाईक आहे. ही बाईक तुम्हाला चांगला मायलेज देऊ शकते. बाईकमध्ये एलईडी डीआरएल, एलसीडी इन्स्ट्रुमेंट कंसोल, बाय फंक्शन एलईडी हेडलाईट सारखे फीचर आहेत. भारतीय बाजारात या बाईकची किंमत १.४६ लाख इतकी आहे.

Story img Loader