List of small cars : सिडान कार आरामदायक प्रवासाची खात्री देते. त्यात सामान ठेवण्यासाठीही भरपूर जागा असते. मात्र मोठी आणि आकाराने लांब असल्याने अनकेदा तिला पार्क करणे किंवा गर्दीतून काढणे कठीण होऊन बसते. त्यामुळे छोट्या कार्सना नागरिक पसंती देतात. छोटी कार पार्किंग स्पेस कमी घेते आणि गर्दीतून किंवा वाहतुकीतून सहज पुढे जाऊ शकते. तुम्ही जर छोटी कार घेण्याचा विचार करत असाल तर पुढील वर्षी, म्हणजे २०२३ साली काही छोट्या कार्स बाजारात उपलब्ध होणार आहेत. आज आपण या कार्सबाबत जाणून घेऊया.

१) एमजी एअर ईव्ही

pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
A heart touching video viral
माणसांमध्ये अजूनही माणुसकी आहे! तरुणाच्या दुचाकीमधून धूर येताच धावून आले लोक, VIDEO होतोय व्हायरल
west pune vs east pune dispute over progress
‘पूर्व’ आणि ‘पश्चिम’ पुण्याचा वाद जुनाच
swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
new maruti suzuki dzire trends pre bookings open varients and features new dzire on google trends
मारुतीचा मोठा धमाका! फक्त ११,००० मध्ये प्री-बूक करा ‘ही’ नवीकोरी कार, व्हेरियंट्स अन् फिचर्स पाहून व्हाल फिदा

MG AIR EV वाहन २०२३ मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनी या इलेक्ट्रिक कारला जनेवरी महिन्यात आयोजित दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करू शकते. ही कार टाटा टियागो ईव्हीला टक्कर देणार असल्याचे सांगितल्या जाते. कारची किंमत १० लाखांपर्यंत असू शकते. कारमध्ये २० ते २५ किलोवॉट हवरचे बॅटरी पॅक मिळू शकते. एकदा चार्ज केल्यावर ही कार 150 किमीची रेंज देण्याची शक्यता आहे.

(प्रतीक्षा संपली! ULTRAVIOLETTE F77 आज होणार लाँच; ३०७ किमी रेंज, ‘ही’ आहे टॉप स्पीड)

२) नवीन पिढीची मारुती स्विफ्ट

उत्तम मायलेज आणि परवडणाऱ्या किंमतीत मिळत असल्याने ग्राहक मारुती सुझुकीच्या कार्सना पसंती देतात. मारुती सुझुकीची स्विफ्ट छोट्या कार्समधून एक आहे. नवीन पिढीची मारुती सुझुकी स्विफ्ट २०२४ मध्ये बाजारात उपलब्ध होऊ शकते. माध्यमांतील अहवालानुसार, २०२४ मारुती स्विफ्ट टोयोटाच्या मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानासह उपलब्ध होऊ शकते. कारमध्ये १.२ लिटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळू शकते.

३) ह्युंडाई ग्रँड आय १० निओ फेसलिफ्ट

या कारला पुढील वर्षी मिड लाईफ अपडेट मिळेल. या मॉडेलची सध्या चाचणी सरू आहे. नवीन मॉडेलमध्ये नवीन ग्रिल, एलईडी डीआरएल्ससह सुधारित हेडलॅम्प्स, अद्ययावत रिअर बंपर आणि नवीन डिजाईन केलेले टेल लॅम्प्स मिळतील. ह्युंडाई ही कार नवीन रंग पर्यायांसह देखील उपलब्ध करू शकते. कारला आतून नवीन अपहोल्स्टेरी मिळू शकते.

(2023 TATA TIGOR EV ३१५ किमी रेंजसह सादर; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

४) सिट्रिऑन सी ३ ईव्ही

नवीन Citroen C3 EV ही २९ सप्टेंबर २०२२ रोजी लाँच होणार होती. मात्र, काही कारणास्तव हे लाँच रद्द करण्यात आले. आता ही कार २०२३ साली लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार ५० किलोवॉट हवर बॅटरी पॅकसह उपलब्ध होऊ शकते. फुल चार्जवर ही कार ३५० किमी रेंज देण्याची शक्यता आहे. कंपनी लहान बॅटरी पॅक असलेली कार देखील उपलब्ध करू शकते, जी ३०० किमी पर्यंतची रेंज देऊ शकेल.