दुचाकी उत्पादक स्वदेशी कंपनी एलएमएल भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करणार आहे. कंपनीने तिच्या आगामी तीन उत्पादनांपैकी एक एलएमएल स्टारसाठी बुकिंग सुरू केले आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर नवीन स्टार ईव्हीसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू केल्याचे सांगितले. तुम्ही एलएमएल वेबसाइटला भेट देऊन एलएमएल स्टार बुक करू शकता.

पैसे न भरता स्कूटर बुक करा

Kal Ho Naa Ho Re-Release
२१ वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान-प्रीती झिंटाचा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
star india produce web series on 90 years journey of reserve bank of india
रिझर्व्ह बँकेच्या ९० वर्षांचा प्रवास उलगडणार वेबमालिकेतून! निर्मितीचे काम ‘स्टार इंडिया’कडे
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास

इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी कंपनी लवकरच एलएमएल स्टार लॉन्च करणार आहे. एलएमएल कंपनीने गेल्या महिन्यातच आपल्या तीन इलेक्ट्रिक टु व्हिलर गाड्या आणल्या होत्या. ज्यात या स्कूटरचा समावेश होता. ही कंपनी भारतात परतल्यानंतर त्यांचं हे पहिलं उत्पादन असेल. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरून पैसे न भरता स्कूटर बुक करू शकणार आहेत.

आणखी वाचा : Toyota Glanza CNG याच महिन्यात होणार लाँच; तगड्या मायलेजसह मिळणार दमदार फीचर्स

कशी असेल नवी इलेक्ट्रिक स्कूटर ?

आगामी इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती आणि पॉवरट्रेनबद्दल आतापर्यंत जास्त माहिती समोर आलेली नाही. निर्मात्याच्या म्हणण्यानुसार, स्टार इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये एक चांगली स्पोर्टी राइड, अॅडजस्टेबल सीटिंग, इंटरएक्टिव्ह स्क्रीन, फोटोसेन्सिटिव्ह हेडलॅम्प इ. असेल. या स्कूटरमध्ये ३६० डिग्री कॅमेरा, एलईडी लाइटिंग आदी सुविधाही असतील. या स्कूटरचे डिझाईन इतर इलेक्ट्रिक स्कूटर्सपेक्षा खूपच वेगळे दिसते आहे.

डॉ. योगेश भाटिया, सीईओ आणि एमडी, एलएमएल म्हणाले, “आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, आमच्या फ्लॅगशिप उत्पादन एलएमएल स्टारसाठी बुकिंग सुरू झाले आहे. एलएमएल आणखी दोन उत्पादने लाँच करेल, ज्यात मूनशॉट आणि ओरियन ईव्ही यांचा समावेश आहे.

किंमत किती?

नवीन एलएमएल स्टारची बाजारपेठेत Ola S1 एअर एंट्री-लेव्हल स्कूटर, बजाज चेतक, TVS iQube आणि इतर इलेक्ट्रिक स्कूटर सोबत टक्कर होणार. या नवीन स्कूटरची किंमत १ लाख ते १.१० लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे.