Maruti Alto: सणासुदीच्या हंगामात नवीन कार घेण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात; पण त्यापैकी कित्येकांना बजेटमुळे माघार घ्यावी लागते. कमी किमतीची कार म्हणजे लेचीपेची आणि महागडी कार म्हणजेच सगळ्यात चांगलं मायलेज देणारी, उत्तम सुरक्षितता असणारी, असं आजकाल अनेकांचं मत झालंय. पण, तुमच्या या लो-बजेटमध्येदेखील तुम्ही हाय-एण्ड फीचर्स असलेली कार खरेदी करू शकता.

दिवसेंदिवस मारुती सुझुकी अल्टोची पसंती वाढत चाललीय. ही एंट्री लेव्हल कार जवळपास दोन दशकांपासून भारतीय रस्त्यांवर राज्य करीत आहे. भारतातील एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह हॅचबॅक कार म्हणून मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) ओळखली जाते. अनेकदा पहिली कार खरेदी करताना लोक याच कारचा विचार करतात. आज आपण याच मारुती सुझुकी अल्टोच्या काही महत्त्वाच्या फीचर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे वर्षाच्या बाराही महिने या कारला मागणी असते.

tanishq
नैसर्गिक हिऱ्यांना कृत्रिम पर्याय नाही; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायणन यांची माहिती
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
Manu Bhaker Special Message to Neeraj Chopra on His Injury in Diamond League
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेरचा नीरज चोप्रासाठी खास संदेश, दुखापतीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हणाली…
onion export duty marathi news
विश्लेषण: कांदा निर्यातीवरील शुल्क कमी होऊनही उत्पादक नाराज का?
Yamaha R15M Carbon Fibre launched
२००८ पासून मार्केट गाजवणारी Yamaha आता नव्या अवतारात दाखल; किंमत पूर्वीपेक्षा कमी, तर इंजिनचंही बदललं रूप
sebi worry about sme ipo
विश्लेषण: ‘एसएमई आयपीओं’तील तेजी खुपणारी का? त्यावर सेबीची चिंता आणि उपाययोजना काय?
batagaika creater
पृथ्वीवरील ‘गेटवे टू हेल’ म्हणून ओळखला जाणारा रहस्यमयी खड्डा काय आहे? त्याचा आकार वाढणं धोक्याचा इशारा आहे का?

हेही वाचा… Flipkart Big Billion Days: बजेटची चिंता सोडा, १ लाखाच्या आत खरेदी करा या ‘बेस्ट ५’ बाईक्स, पाहा यादी

१. कमी किंमत

अल्टोचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे त्याची परवडणारी किंमत. ही एक बजेट-फ्रेंडली कार आहे, जी बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबेदेखील सहज खरेदी करू शकतात. या कारची सुरुवातीची किंमत ३.९९ लाख रुपये आहे, जो या कारचा प्लस पॉईंट आहे.

२. भरपूर मायलेज

मारुती अल्टोचे मायलेज ही एक या कारची जमेची बाजू आहे. पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही प्रकारांमध्ये ही कार उपलब्ध असल्याने ती इंधन वाचविण्यास सक्षम आहे. इंधनाचा वापर कमी असल्याने या कारचा वापर दीर्घकाळासाठी आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरतो.

३. कमी देखभाल खर्च

मारुतीच्या कार देखभालीच्या दृष्टीने अतिशय किफायतशीर आहेत. अल्टोचा मेंटेनन्स खर्चही खूप कमी आहे, ज्यामुळे ती दीर्घकाळ चालवणे सोपे जाते. या कारचे स्पेअर पार्ट्सही स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत.

हेही वाचा… टाटाचा नाद करायचा नाय! नव्या अवतारात लॉन्च झाली ही सीएनजी कार, पॉवरफुल इंजिन अन् मायलेजसह किंमतही कमी

४. कॉम्पॅक्ट डिझाइन आणि पार्किंगची उत्तम सोय

अल्टोच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे शहरी भागात वाहन चालवणे आणि पार्किंग करणे सोपे होते. तसेच अरुंद रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी गाडी चालवणे व पार्क करणे खूप सोपे आहे.

५. विश्वसनीय ब्रॅण्ड आणि पुनर्विक्री मूल्य

मारुती सुझुकी हा भारतातील सर्वांत विश्वासार्ह ब्रॅण्ड आहे. अल्टोची पुनर्विक्री किंमतदेखील खूप चांगली आहे; ज्यामुळे कार विकल्यावर चांगला परतावा मिळतो.