बँगलोर स्थित प्रवेग डायनामिक्स भारतामध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची इलेक्ट्रिक एसयूव्ही अधिकृतपणे २५ नोव्हेंबर रोजी लॉन्च होईल, तथापि, त्याचे नाव अद्याप माहित नसून ही एसयूव्ही दमदार ड्रायव्हिंग रेंजसह येणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एकदा चार्ज केल्यानंतर ५०० किमीपर्यंत शानदार रेंज देण्यास सक्षम असेल.

कशी असेल ही कार ?

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
capacity of 200 e-bus charging stations in the ST fleet will also increase in one year
एसटीच्या ताफ्यात वर्षभरात २०० ई-बस चार्जिंग स्टेशनची क्षमताही वाढणार
electricity cost hike
वीजदरवाढ तूर्तास टळली, ‘डीसल्फरायझेशन’ची सक्ती दोन वर्षे लांबणीवर गेल्याने दिलासा
Uran gas power plant is producing 300 MW of electricity instead of 672 MW
वायू पुरवठ्याविना वीज प्रकल्प ‘गॅसवर’ उरण वीज प्रकल्पातील उत्पादन निम्म्यावर
hyundai creta electric features specifications and price in marathi
TATA ला टक्कर देणार Hyundai ची ‘Creata Electric’ कार! फक्त ५८ मिनिटांत चार्ज अन् 473 KM रेंज! जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
Janshatabdi Tejas and Mangaluru Express will run only till Thane and Dadar
कोकणातील तीन रेल्वेगाड्या ठाणे, दादरपर्यंत धावणार

प्रवेग डायनामिक्स काही काळापासून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीचा टीझर रिलीज करत आहे. ईव्ही निर्मात्याने वरून ईव्हीचा स्वच्छ लुक शेअर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंपनीने शेअर केलेल्या इमेजमध्ये आगामी इलेक्ट्रिक कारमध्ये मोठा पॅनोरॅमिक सनरूफ आणि वाइड बॉडी दिसत आहे.

याशिवाय, जवळून पाहिल्यास एसयूव्हीच्या मागील बाजूस एक स्लीक एलईडी टेललाइट बार दिसतो. प्रवेग इलेक्ट्रिक एसयूव्हीचा फ्रंट फेस स्लीक एलईडी हेडलाइट युनिट्ससह येण्याची शक्यता आहे. याला मजबूत आणि बोल्ड लूक देण्यासाठी, याला मोठ्या चाकांच्या कमानी देखील मिळतील, जे काही प्रमाणात रेंज रोव्हर एसयूव्हीची आठवण करून देऊ शकतात.

आणखी वाचा : आता तैवानचा Gogoro Electric Scooter भारतात लाँच होणार; जाणून घ्या फीचर्स आणि रेंज

कंपनीने म्हटले आहे की EV ४०२ bhp पर्यंत जास्तीत जास्त पॉवर जनरेट करू शकते, जे Volvo XC40 रिचार्ज सारखे आहे, Kia EV6 पेक्षा जवळजवळ दुप्पट आणि Audi e-tron पेक्षा जास्त आहे. कंपनीने अद्याप इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या टॉर्कचे आकडे उघड केलेले नाहीत.

सिंगल चार्जमध्ये ५०० किलोमीटरपर्यंत रेंज

प्रवेगने यापूर्वी दावा केला होता की, इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर ५०० किलोमीटरपेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंजसह येईल. जलद चार्जिंग पर्यायासह ३० मिनिटांत ते ८० टक्के पर्यंत चार्ज केले जाऊ शकते. इलेक्ट्रिक एसयूव्ही २०० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेग वाढवू शकते आणि फक्त ४.३ सेकंदात ० ते किमी प्रतितास वेग वाढवू शकते.

Story img Loader