MS Dhoni: महेंद्रसिंह धोनी हा जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असा क्रिकेटपटू आहे. तो भारताचा तिन्ही प्रकारातील सर्वात सर्वोत्तम कर्णधार म्हणून प्रसिद्ध आहे. बेस्ट फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे. धोनीला अनेक कार्स आणि बाईक्स वापरण्याची आवड आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्याकडे अनेक महागड्या कार आणि बाईक्स आहेत. धोनी हा सर्वांचाच आवडता खेळाडू आहे. आज आपण त्याच्याकडील क्लासिक कार कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत.

Pontiac Firebird Trans-Am

एम्स धोनीने काही कालावधीआधी लाल रंगाचा Pontiac Firebird Trans-Am खरेदी केली होता. जो ट्रान्स अमची सेंकड जनरेशन आहे व ४० वर्षे जुनी असली तरी ती अजून देखील अत्यंत सुस्थितीमध्ये दिसते. धोनीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती तेव्हा त्याने स्वतःला ही कार भेट दिली होती. Trans-Am या कारमध्ये इतर मसल कारप्रमाणेच मोठे इंजिन जे 455 बिग-ब्लॉक V8 द्वारे समर्थित आहे. हे इंजिन सुमारे ३२५ बीएचपीचे उत्पादन करते आणि हे 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

MS Dhoni Seven Rupee Coin Fake News
MS Dhoni Coin : एमएस धोनीच्या सन्मानार्थ सरकार सात रुपयांचे नाणे आणत आहे? काय आहे सत्य? जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
Mandhardev , Kalubai yatra, devotees ,
मांढरदेव यात्रेला सुरुवात, ‘काळूबाई’च्या जयघोषात हजारो भाविक दाखल
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
Changes in traffic on national and state highways on occasion of Jijau Jayanti
जिजाऊ जयंतीनिमित्त ‘या’ राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील वाहतुकीत बदल
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर

हेही वाचा : Smriti Mandhana Car Collection: स्मृती मंधानाचं कार कलेक्शन पाहून तुम्हीही व्हाल थक्क; ताफ्यात आहेत ‘इतक्या’ महागड्या कार

Rolls Royce Silver Shadow II

एका अहवालानुसार ही खास लक्झरी सेडान कार तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा धोनी वर्कशॉपमध्ये कारची दुरुस्ती करत असताना त्याच्या मित्रांसोबत डिनर करताना दिसला होता. या कारचे इंजिन हे V8 द्वारे समर्थित आहे. तसेच यात GM-sourced गिअरबॉक्स आणि ट्रिपल-सर्किट ब्रेकिंग सिस्टमशी जोडलेले आहे.

Image credit – Sakshi Dhoni’s instagram

1969 Ford Mustang

भारतिचे क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या कर कलेक्शनमध्ये आणखी एक जबरदस्त कार आहे. त्याचे नाव म्हणजे 1969 ची फोर्ड मस्टँग क्लासिक कार. ही कार धोनीने २०२१ मध्ये खरेदी केली. धोनीच्या गॅरेजमध्ये असणारे हे वाहन सुद्धा इतर वाहनांप्रमाणेच पूर्ववत करण्यात आले आहे. या कारमध्ये ५.० लिटरचे V८ इंजिन येते. हे इंजिन २२१ बीएचपी आणि ४०६ पीक टॉर्क जनरेट करते.

हेही वाचा : फक्त ३० हजार रुपयांत Tata Motors च्या ‘या’ जबरदस्त SUV च्या बुकिंगला झाली सुरुवात, जाणून घ्या फिचर्स

Ferrari 599 GTO

२०११ ODI चा विश्वचषक भारताने जिंकला होता. तेव्हा २८ वर्षानंतर कर्णधार धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकला होता. तेव्हा धोनीला फेरारी 599 GTO भेट देण्यात आली होती आणि ती त्याच्या कलेक्शनमधील सर्वात शक्तिशाली कार आहे. या कारचे इंजिन 6.0-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड V12 चे येते. जे ६६१ बीएचपी टॉर्क जनरेट करते. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ०-१०० किमी प्रतितास इतका वेग पकडण्यासाठी ही कार ३.५ सेकंदापेक्षा कमी वेळ घेते.

Image Credit – Sakshi Dhoni’s Instagram

1972 Land Rover Series Station Wagon

अलीकडेच बिग बॉय टॉईजने आयोजित केलेल्या ऑनलाईन लिलावामध्ये धोनीने १९७१ च्या लॅन्ड रोव्हर सीरिजच्या Station Wagon बोली जिंकली. वॅगनमध्ये पिवळा आणि पांढरा ड्युअल टन फिनिश असा रंग येतो. हे एक प्राचीन वाहन आहे. लॅन्ड रोव्हर सिरीजमधील ब्रिटिश ऑटोमेकरने उत्पादित केलेली ही सर्वात लोकप्रिय कार मानली जाते.

Nissan Jonga

निसान जोंगा ही धोनीची सर्वात खास कार मनाली जाते. कारण ही कार खास भारतीय सशस्त्र दलांसाठी तयार करण्यात आली आहे. सशस्त्र दलांच्या सन्मानासाठी त्याने ही कार आपल्या कलेक्शनमध्ये जोडली.

Image Credit – Sakshi Dhoni’s Instagram

या सुंदर आणि क्लासिक कार्स व्यतिरिक्त एमएस धोनीकडे एक Hummer H2, GMC Sierra, फर्स्ट जनरेशन मित्सुबिशी पजेरो आणि कस्टम मेड 2-डोर महिंद्रा स्कॉर्पिओ देखील आहे.

Story img Loader