Mahindra & Mahindra: महिंद्रा अँड महिंद्रा ही वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधील सर्वात लोकप्रिय अधिकंपनी आहे. ही देशातील आघाडीची एसयूव्ही तयार करणारी कंपनी आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने नुकतेच लाँच केलेल्या SUV Scorpio-N या मॉडेलच्या किंमती वाढविल्या आहेत. ही गाडी लाँच केल्यापासून सहा महिन्यांच्या आत कंपनीने याची किंमत १ लाख रुपयांनी वाढविल्या आहेत.
महिंद्रा स्कॉर्पिओ एन एसयूव्ही हे जुन्या स्कॉर्पिओ एसयूव्हीचे नवीन मॉडेल आहे. २७ जून २०२२ रोजी ही गाडी लाँच झाली होती. त्याची किंमत सुमारे ११.९९ लाख रुपये इतकी होती. या मॉडेलच्या सर्वच गाड्यांची किंमत सुमारे ५ हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.
मॅन्युअल ट्रान्समिशनसह ७ सीटर गाड्यांच्या किंमती कंपनीने वाढवल्या आहेत. या आधी या गाडीची किंमत १९.९४ लाख इतकी होती. आता त्याची किंमत १.०१ लाख रुपयांनी वाढली आहे. आता या गाडीची किंमत २०. ९५ लाख इतकी असेल. सर्वात जास्त किंमत ही टॉप मॉडेलची असणार आहे. त्याची किंमत ही २४.०५ लाख इतकी असेल. Scorpio-N च्या बेस व्हेरियंटमध्ये पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही मॉडेलच्या किंमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. ही वाढ साधारण ६५००० ते ७५००० रुपयांची आहे.