देशामध्ये सध्या SUV खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स असलेल्या एसयूव्ही लॉन्च करत असतात. तसेच यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा एक प्रमुख एसयूव्ही निर्माता कंपनी आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने मागील वर्षी इंग्लंडमध्ये आपले नवीन EV ब्रँड सादर केले होते. आता २०२६ पर्यंत भारतात ५ इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करण्याची तयारी सुरु असल्याचे कंपनीने सांगितले. अपकमिंग इलेक्ट्रिक व्हेइकल्स महिंद्राच्या अत्याधुनिक INGLO EV प्लॅटफॉर्मवर आधारित असतील.
Mahindra XUV.e8 (लॉन्च टाइमलाइन : डिसेंबर २०२४)
महिंद्रा XUV.e8 ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. तसेच हिला डिसेंबर २०२४ पर्यंत लॉन्च करण्यात येणार आहे. हे मॉडेल XUV700 चे इलेक्ट्रिफाइड एडिशन आहे ज्यात ८० kWh क्षमतेची बॅटरी पॅक सुविधा असेल.
Mahindra XUV.e9 (लॉन्च टाइमलाइन : एप्रिल २०२५ )
त्यापाठोपाठ महिंद्रा XUV.e9 ही इलेक्ट्रिक कार एप्रिल २०२५ पर्यंत बाजारात लॉन्च केली जाण्याची अपेक्षा आहे. पाच सिट्सची जागा असणाऱ्या या एसयूव्हीची लांबी ४,७९० मिमी , रूंदी १,९०५ मिमी आणि उंची १,६९० मिमी इतकी असेल. कंपनी या मॉडेलसह पॉवरट्रेन शेअर करू शकते.
Mahindra BE.05 (लॉन्च टाइमलाइन : ऑक्टोबर २०२५ )
महिंद्राच्या BE सेगमेंटमध्ये तीन इलेक्ट्रिक एसयूव्हीचा समावेश असेल. BE.05, BE.07 आणि BE.09.महिंद्रा BE.05 ऑक्टोबर २०२५ पर्यंत भारतात लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे. हे स्पोर्ट युटिलिटी वाहन असेल. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
Mahindra BE Rall-E (लॉन्च टाइमलाइन : ऑक्टोबर २०२५ )
महिंद्रा BE रोल ई, ही BE.05 इलेक्ट्रिक SUV चे अधिक ऑफ-रोड-केंद्रित व्हर्जन आहे. हे हैदराबादमधील महिंद्रा ईव्ही फॅशन फेस्टिवलमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही २०२५ पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे.
Mahindra BE.07 (लॉन्च टाइमलाइन : ऑक्टोबर २०२६ )
या लिस्टमध्ये शेवटच्या यादीमध्ये नाव आहे ते म्हणजे महिंद्रा BE.07 चे. BE.07 आहे जी, BE.05 पेक्षा वेगळी, बॉक्सी डिझाइनसहएक पारंपरिक SUV असेल. ही ऑक्टोबर २०२६ पर्यंत लॉन्च केली जाण्याची अपेक्षा आहे. मात्र महिंद्रा कंपनीने अद्याप फ्लॅगशिप BE.09 coupe SUV च्या लॉन्चिंगची टाइमलाइन उघड केलेली नाही.