देशातील दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्रा ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि परवडेल अशा किमतीत अनेक नवनवीन कार बाजारात लाँच करत असते. तसेच, काही मॉडेल्स अपडेट करत असते. महिंद्रा कंपनीच्या कार जबदस्त फीचर्स, लूक, डिझाईनमुळे खूप पसंत केल्या जातात. आता देशांतर्गत ऑटोमोबाईल उत्पादक महिंद्राने आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV XUV 3XO भारतात लाँच केली आहे. ही एसयूव्ही बाजारात टाटाच्या नेक्सॉन एसयूव्हीला टक्कर देईल, असे सांगितले जात आहे. चला या एसयूव्हीच्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया…

अद्ययावत XUV 3XO ही कार XUV 300 च्या तुलनेत नवीन डिझाइन, अधिक वैशिष्ट्ये, तंत्रज्ञान आणि चांगली कामगिरी देते. महिंद्राने XUV 3XO चे ९ प्रकार सादर केले आहेत, ज्यात MX1, MX2, MX3, MX2 Pro, MX3 Pro, AX5, AX5L, AX7 आणि AX7L यांचा समावेश आहे.

Maharashtra no minimum support price
शेतीमालाला हमीभाव नाहीच, जाणून घ्या, हमीभाव किती, मिळणारा दर किती
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
Police seized Gutkha worth rupees 21000 at Sawal Ghat
गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा तस्करी, वाहनासह १५ लाखाचा मुद्देमाल जप्त

या एसयूव्हीला XUV300 च्या तुलनेत खूपच नवीन डिझाइन देण्यात आले आहे. यामध्ये, कंपनीने स्प्लिट एलईडी हेडलाइट सेटअपसह फ्रंटमध्ये सी-आकाराचे एलईडी डीआरएल, मेश पॅटर्नमध्ये ब्लॅक आऊट ग्रिल आणि फ्रंट बंपर पुन्हा डिझाइन केले आहे.

(हे ही वाचा : Maruti Ertiga, Kia Carens समोर तगडं आव्हान, टोयोटाच्या MPV कारचा नवा व्हेरिएंट देशात दाखल, किंमत फक्त…)

एसयूव्हीचे डिझाइन मागील बाजूसही आकर्षक आहे. जर आपण मागील प्रोफाइलबद्दल बोललो तर त्याच्या मागील बाजूस कनेक्टिंग टेल लाइट आहे. बॅकलाइट देखील सी-आकारात दिलेला आहे. महिंद्राच्या नवीन ब्रँड लोगोसोबत, XUV 3XO लोगो देखील SUV च्या बूट दरवाजावर देण्यात आला आहे.

जर केबिनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने XUV 3XO मध्ये पूर्णपणे अपडेटेड केबिन दिले आहे. त्याचे केबिन मागील मॉडेलपेक्षा मोठे आणि पूर्णपणे वेगळे दिसते. डॅशबोर्डमध्ये १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल आहे. याशिवाय, इंटीरियरमध्ये नवीन स्टीयरिंग व्हील, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, ॲम्बियंट लाइटिंग, ३६०-डिग्री सराउंड कॅमेरा, लेदरेट सीट आणि पुन्हा डिझाइन केलेले सेंटर कन्सोल आहे.

एसयूव्हीमध्ये मागील एसी व्हेंटचीही सुविधा आहे. याशिवाय, SUV मध्ये पॅनोरामिक सनरूफ आणि लेव्हल-२ ADAS सूट सारख्या फर्स्ट-इन-सेगमेंट सुरक्षा वैशिष्ट्यांसह देखील येतो. XUV 3XO तीन पॉवरट्रेन पर्यायांसह सुसज्ज आहे ज्यात १.२-लीटर टर्बो-पेट्रोल, १.२-लीटर GDi टर्बो पेट्रोल आणि १.५-लीटर डिझेल इंजिन समाविष्ट आहे. ट्रान्समिशनसाठी ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर युनिटचा पर्याय उपलब्ध आहे.

किंमत किती?

महिंद्राने ही SUV अत्यंत कमी किमतीत ७.४९ लाख रुपयांत (एक्स-शोरूम) लाँच केली आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत १३.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.