Mahindra Mega Service Camp: देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहनांना देशात मोठी पसंती मिळत असते. आपल्या SUV कारद्वारे ही कंपनी सतत ग्राहकांची मने जिंकत आहे. अद्ययावत थार आणि नवीन XUV700 पासून Scorpio-N आणि बोलेरो पर्यंत, Mahindra SUV ने कंपनीला प्रचंड यश मिळवून दिले आहे. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांना विक्रीनंतरही चांगली सेवा देण्यावर भर देत आहे. यामुळेच कंपनीने एक उत्तम ऑफर सुरू केली आहे. महिंद्राने देशभरातील ग्राहकांसाठी मेगा सर्व्हिस कॅम्प सुरू केला आहे. त्याला ‘M-Plus’ असे नाव देण्यात आले आहे.
सर्विस कॅम्पमध्ये ‘ही’ सेवा मिळणार
महिंद्रा सर्व्हिस कॅम्प आज १६ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे. हे देशातील ६०० हून अधिक अधिकृत कार्यशाळांमध्ये आयोजित केले जाईल. एका प्रेस स्टेटमेंटमध्ये, कंपनीने उघड केले की, ग्राहक प्रत्येक वाहनावर ७५-पॉइंट चेक घेऊ शकतात आणि ५,००० पेक्षा जास्त सेवा विनामूल्य मिळवू शकतात.
कंपनीने आयोजित केलेल्या सेवा शिबिरात एसयूव्हीची सेवा, बॅटरी तपासणी, इलेक्ट्रिकल सिस्टीम तपासणी, सस्पेन्शन तपासणी यासह ७५ पॉइंट्समध्ये अनेक भाग तपासले जाणार आहेत. तपासणी केल्यानंतर, कंपनीचे तंत्रज्ञ तुम्हाला एसयूव्हीमध्ये काही बिघाड असेल तर संपूर्ण माहिती देतील, ज्यामुळे तुम्हाला आगामी काळात कोणत्या प्रकारचे काम करावे लागेल हे समजणे सोपे होईल. यासोबतच कंपनी या कालावधीत स्पेअर पार्ट्स, लेबर, मॅक्सिकेर आणि अॅक्सेसरीजवर अतिरिक्त सवलत देईल.
(हे ही वाचा : धूम मचाले धूम..! तरुणाईला वेड लावणारी ‘ही’ पॉवरफुल बाईक आली बाजारात, ‘या’ दिवशी बुकिंग सुरू )
कंपनी आपली पेपरलेस सेवा सुविधा देखील पुढे नेत आहे, ज्यामध्ये महिंद्राचे ग्राहक डिजिटल रिपेअर ऑर्डर आणि इनव्हॉइस प्राप्त करण्याचा पर्याय निवडू शकतात. अधिकृत मोबाइल अॅपचा वापर वाहन दस्तऐवज संग्रहित करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो आणि ते डिजीलॉकरसह एकत्रित केले आहे.
महिंद्राच्या वाहनांना ग्राहकांचा उत्सफुर्त प्रतिसाद
महिंद्रा प्रवासी वाहनांच्या क्षेत्रात खूप वेगाने वाढत आहे. इलेक्ट्रिक कारमध्येही कंपनीने चांगली सुरुवात केली आहे. कंपनीने नुकतीच ‘Mahindra XUV400 electric SUV’ लाँच केली आहे, ज्याचे ग्राहक उत्तम बुकिंग करत आहेत. हे फुल चार्जमध्ये ४५६ किमी रेंज देते.