महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ही भारतातील वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांतील अग्रगण्य कंपनी आहे. महिंद्रा आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने खास वेगळेपण असलेली वाहने घेऊन येण्याचा प्रयत्न करते. आता महिंद्राने ‘स्कॉर्पिओ-एन’ या गाडीची पाच व्हर्जन्स बाजारात आणली आहेत. यामध्ये दोन पेट्रोल तर तीन व्हर्जन्स डिझेलवर चालणारी आहेत. यामुळे ‘स्कॉर्पिओ-एन’ बाजारातील अन्य कारला जबदरस्त फाइट देणार असं दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने जून २०२२ च्या अखेरीस स्कॉर्पिओ एन या गाडीची पाच व्हर्जन्स लाँच केली. या गाडीला अल्पावधीतच ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. ही गाडी लोकांना इतकी आवडली आहे की ग्राहक या गाडीसाठी वर्षभर सुद्धा थांबण्यासाठी तयार आहेत.

हेही वाचा : १८,७०० रुपयांच्या बुलेटची सोशल मीडियावर चर्चा; ‘हा’ बिल पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या!

महिंद्रा ‘स्कॉर्पिओ एन’ ची वैशिष्ट्ये

महिंदा अँड महिंद्रा कंपनीने लाँच केलेल्या ‘स्कॉर्पिओ एन’ या गाडीमध्ये अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. स्कॉर्पिओ एन च्या Z2 बेसमध्ये हॅलोजन लाईट्स , १६ इंचाचे स्टील व्हील , पेट्रोल ट्रिमवर इलेक्ट्रिकली पॉवर स्टीयरिंग व्हील आणि पॉवर विंडो , टम्बल फंक्शन, आठ इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यासारखी वैशिष्ट्ये या गाडीमध्ये मिळणार आहेत. मोबाईल चार्ज करण्यासाठी स्टिअरिंग व्हीलजवळ चार्जर पॉईंट देण्यात आला आहे.

या गाडीमध्ये Z2 G MT E (पेट्रोल) आणि Z2 D MT E (डिझेल) या प्रकारांमध्ये इलेट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल होल्ड असीस्ट अशी फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच सहा गिअर असून हे फीचर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा : Mercedes, Audi luxury cars आता ‘इतक्या’ स्वस्तात; पाहा हा घसघशीत आॅफर कुठे मिळतोय

किंमत

स्कॉर्पिओ एन गाडीच्या प्रकारांमध्ये Z2 G MT E, Z2 D MT E, Z4 G MT E, Z4 D MT E आणि Z4 D MT 4WD E हे पाच प्रकार आहेत. कमी बजेट असणाऱ्यांसाठी Z2 आणि Z4 हे प्रकार अधिक सोयीस्कर असणार आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ एन Z2 G MT E ची किंमत 12.49 लाख इतकी असणार आहे. त्यासोबत स्कॉर्पिओ एन Z2 D MT E याची किंमत 12.99 लाख तर स्कॉर्पिओ एन Z4 G MT E या प्रकाराची किंमत 13.99 लाख इतकी आहे. स्कॉर्पिओ एन Z4 D MT E ची किमंत 14.49 लाख आणि स्कॉर्पिओ Z4 D MT 4WD E ची किमंत 16.94 लाख इतकी आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra and mahindra has launched five new versions of scorpio n auto news tmb 01