महिंद्रा ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. महिंद्रा थार 5-डोअर SUV ही अलीकडच्या काळातील बहुप्रतिक्षित SUV पैकी एक आहे. कार या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारतीय बाजारपेठेत येईल अशी अपेक्षा होती. मात्र कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, नवीन महिंद्रा थार ५ डोअर पुढील वर्षी देशात लॉन्च केली जाईल. लॉन्च झाल्यानंतर महिंद्रा थार ५ डोअर बाजारात उपलब्ध असलेल्या मारुती सुझुकीच्या जिमनी 5 डोअरला टक्कर देईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतीच कंपनीची बोर्ड मिटिंग पार पडली. या बैठकीत महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि सीईओ (ऑटो अँड फार्म सेक्टर) राजेश जेजुरीकर यांनी अधिकृतपणे ५-डोअरच्या थारची लॉन्चच्या टाइमलाईनची घोषणा केली. सीईओ राजेश जेजुरीकर यानी सांगितले, ”भारतीय बाजारात कंपनीची बहुप्रतीक्षित महिंद्रा थार ५-डोअरचे लॉन्चिंग पुढील पुढील वर्षी केले जाईल.” पुढे ते म्हणाले, चालू वर्षामध्ये कंपनीकडून कोणतेही नवीन वाहन लॉन्च करण्याची योजना नाही. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सध्या प्रलंबित असलेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : MG च्या ‘या’ EV कारने पार केला १० हजार युनिट्सच्या विक्रीचा टप्पा, घरी आणि ऑफिसमध्ये कंपनी देणार…

महिंद्रा थार ५-डोअर अनेकवेळा रस्त्यावर टेस्टिंग करत असताना पाहिली गेली आहे. लॉन्च होणारे वाहन हे सध्याच्या एसयूव्ही मॉडेलपेक्षा लांब आणि रुंद असेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय अपकमिंग महिंद्रा थारमध्ये एक एक्सटेंडेड व्हीलबेस मिळू शकतो. यामध्ये थ्री-रो सेटअप मिळण्याची शक्यता आहे. तसेच कंपनी यामध्ये काही अधिकचे नवीन फीचर्स जोडू शकते.

इंजिन आणि गिअरबॉक्स

महिंद्रा थार डोअर -५ एसयूव्हीला तेच इंजिन असणार आहे जे सध्याच्या ३-डोअर मध्ये आहे. यामध्ये २.० लिटर mStallion टर्बोचार्ज पेट्रोल मोटर आणि २.२ लिटर mHawk चे डिझेल इंजिन मिळू शकते. महिंद्रा अतिरिक्त वजन मॅनेज करण्यासाठी त्याचे पॉवर आउटपुट वाढवू शकते. ट्रान्स्मिशनसाठी इंजिनसह ६-स्पीड MT आणि ४X४ क्षमतेसह ६-स्पीड AT सह जोडण्यात आले आहे.