देशातील लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (महिंद्रा अँड महिंद्रा) ने विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. महिंद्रासाठी जून महिना उत्तम राहिला आहे. कंपनीने केवळ वेगाने कार विकल्या नाहीत तर वाढीच्या बाबतीत मारुती, टाटा आणि ह्युंदाई सारख्या कंपन्यांनाही मागे टाकले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (M&M Limited), भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह कंपन्यांपैकी एक, ने सोमवारी जाहीर केले की जून २०२३ मध्ये त्यांची एकूण वाहन विक्री ६२,४२९ वाहने होती. युटिलिटी वाहन विभागामध्ये, महिंद्राने देशांतर्गत बाजारपेठेत ३२,५८५ वाहने आणि निर्यातीसह एकूण ३३,९८६ वाहनांची विक्री केली.
कंपनीने सांगितले की, एअरबॅग ECU सारख्या काही भागांवर सेमीकंडक्टर पुरवठा समस्या या महिन्यातही चालू राहिल्या. महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे अध्यक्ष विजय नाकरा यांच्या मते, “एसयूव्ही पोर्टफोलिओच्या जोरदार मागणीसह, जूनमध्ये ३२,५८५ युनिट्सच्या देशांतर्गत विक्रीसह २२ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.
(हे ही वाचा : ६ लाखाच्या ‘या’ सुरक्षित कारसमोर Tata Nexon ची बोलती बंद? मिळताहेत ‘हे’ भरभरुन सेफ्टी फीचर्स )
मारुती आणि ह्युंदाईची विक्री
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत विक्रीत ८ टक्क्यांनी वाढ नोंदवली असून ती १,३३,०२७ युनिट्सवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात १,२२,६८५ युनिट्स होती. ह्युंदाईने सांगितले की, “देशांतर्गत विक्री मे २०२२ मध्ये ४९,००१ युनिट्सच्या तुलनेत मे महिन्यात ५०,००० युनिट्सवर वर्षभरात दोन टक्क्यांनी वाढली.”
त्याचप्रमाणे टाटा मोटर्सची एकूण देशांतर्गत विक्री जूनमध्ये वर्षभरात एक टक्क्याने वाढून ८०,३८३ युनिट्सवर गेली आहे, कंपनीने शनिवारी ही माहिती दिली. कंपनीने जून २०२२ मध्ये ७९,६०६ वाहनांची विक्री केली होती.