Mahindra SUV Sales: महिंद्राच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षी कंपनीने Scorpio-N लाँच केल्यापासून त्याची विक्री आणखी वाढली आहे. गेल्या वर्षी, महिंद्राने केवळ स्कॉर्पिओ-एन लाँच केले नव्हते, तर काही दिवसांनंतर, नियमित स्कॉर्पिओ देखील नवीन अवतारात लाँच करण्यात आली होती. त्याला स्कॉर्पिओ क्लासिक असे नाव देण्यात आले आहे. म्हणजेच, सध्या कंपनी स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक या दोन एसयूव्ही स्कॉर्पिओ नेमप्लेटसह विकत आहे. एप्रिल (२०२३) च्या शेवटच्या महिन्यात या दोघांच्या एकत्रित विक्रीचा कंपनीच्या एकूण विक्रीत सर्वाधिक वाटा आहे.
या दोघांची एकत्रित विक्री एप्रिलमध्ये ९,६१७ युनिट्सवर होती. यासह स्कॉर्पिओ ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली. वार्षिक आधारावर स्कॉर्पिओ (Scorpio-N आणि Scorpio Classic) च्या विक्रीत २५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. कारण गेल्या वर्षी (२०२२) एप्रिल महिन्यात फक्त २,७१२ युनिट्स विकल्या गेल्या होत्या. परंतु, या वर्षी एप्रिलमध्ये विक्री वाढून ९,६१७ युनिट्स झाली. वास्तविक, कंपनीकडे Scorpio-N साठी मोठ्या प्रमाणात बुकिंग आहे. कंपनीने यासाठी पहिल्यांदाच (गेल्या वर्षी) बुकिंग सुरू करताच, पहिल्या अर्ध्या तासात १ लाखांहून अधिक बुकिंग मिळाले.
(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ SUV कारसाठी ग्राहक झाले वेडे, ५ महिन्यांत ३०,००० हून अधिक लोकांनी केली बुकींग, किंमत फक्त…)
महिंद्रा बोलेरोची विक्री
जरी सहसा बोलेरो बहुतेक महिन्यांत कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी SUV राहिली, परंतु एप्रिल महिन्यात असे घडले नाही, बोलेरो दुसऱ्या क्रमांकावर आली. महिंद्रा बोलेरोच्या एकूण ९,०५४ युनिट्सची विक्री झाली आहे. तथापि, त्याची विक्री देखील वार्षिक आधारावर वाढली आहे, त्याची विक्री १८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी (२०२२) एप्रिल महिन्यात बोलेरोच्या एकूण ७,६८६ युनिट्सची विक्री झाली होती, तर यावर्षी एप्रिलमध्ये ९,०५४ युनिट्सची विक्री झाली होती. यामध्ये बोलेरो निओच्या विक्रीच्या आकडेवारीचाही समावेश आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओ एनची किंमत १३.०५ लाख रुपयांपासून सुरू होत असून ही २४.५२ लाख रुपयांपर्यंत जाते.